
वणी :- येथील श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे वनी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर हे मागील तीन दिवसापासून नांदेड वरून बेपत्ता झाले होते ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीवर गुरुकुंज मोझरी येथे गुरुकुलचे संचालक रवी मानव यांना आढळून आले असता त्यांनी काल सायंकाळी आठ वाजता दिलीप भोयर यांना सुखरूप घरी आणून सोडले.
येथील तहसील कार्यालयाजवळ पंचायत समिती सभागृहाच्या बाजूला तत्कालीन गटविकास अधिकारी यांची रीतसर परवानगी घेऊन शेतकरी तक्रार निवारण व मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले. याच केंद्रात ते त्यांच्या उवजीविकेसाठी झेराक्सचा व्यवसाय करीत होते तसेच या केंद्राच्या माध्यमातून दिलीप भोयर हे शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फळत होते व अनेक सामाजिक आंदोलनात हिरडीने सहभाग घेत होते तसेच वयोवृद्ध विधवा माता भगिनी दिव्यांग गोरगरीब लोकांचे निराधाराचे काम निशुल्कपणे अहोरात्र करत होते त्यामुळे संपूर्ण तालुक्यासह झरी, मारेगाव तालुक्यात मध्ये देखील त्यांचे चांगलेच प्रस्थ वाढू लागले होते त्यामुळे सत्तेतील राजकारण्यांची खुर्ची हळू हळू हलू लागली होती त्यामुळे त्यांचे राजकीय शत्रूही वाढले होते. म्हणून अनेक जण त्यांनी करत असलेल्या गोरगरिबांच्या सेवेवर डोळा ठेवून होते अचानक वणी येथे नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असता अतिक्रमणाची कोणतीही नोटीस न देता सरळ सरळ दिलीप भोयर यांच्या दोन्ही दुकानांवर जेसीबी चालवण्यात आली व त्यांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली यात त्यांचे लाखोंची नुकसान झाले आहे. सदरचे अतिक्रमन पूर्वसूचना न देता काढल्याने त्यांच्या दुकानांची तोडफोड केल्याने दिलीप भोयर हे व्यथित झाले आणि त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाल्याने त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती व ते पंढरपूर वरून येत असताना मध्येच नांदेड येथून बेपत्ता झाले होते त्यामुळे सर्वांना त्यांच्या सुखरूपाची चिंता लागली होती अनेक गोरगरीब निराधार लोक दिलीप भोयर हे घरी परत यावे याकरिता ईश्वराकडे प्रार्थना करू लागले होते मागील तीन दिवसापासून बेपत्ता असलेले दिलीप भोयर हे गुरुकुंज मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीवर रात्री बारा वाजताच्या सुमारास समाधीसमोर बसून असल्याचे रवी मानव यांना निदर्शनास आले असता त्यांनी जवळ जाऊन चौकशी केली व दिलीप भोयर सुखरूप मिळाल्याने आनंद व्यक्त केला व त्यांना काल रात्री आठ वाजताच्या सुमारास वणी येथे आणून सोडले दिलीप भोयर हे सुखरूप घरी परतल्याची वार्ता तमाम तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे तालुक्यातील सर्व गोरगरीब निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
मागील तीन आठवड्यापासून दिलीप भोयर हे पंढरपुरात होते
पंढरपूर येथील ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर हे काही विकृत लोकांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याने सदर मंदिर वाचविण्यासाठी दिलीप भोयर हे मागील तीन आठवड्यापासून पंढरपूर येथे आपला डेरा टाकून होते सदरचे मंदिर पूर्णतः ताब्यात घेऊन तेथील समर्पित सेवा कार्य करणारे सेवक रामजी मिलमिले यांच्या ताब्यात देऊन ते पंढरपूर वरून वणीला परत येत होते मध्येच त्यांना त्यांच्या दुकानांची तोडफोड केल्याची वार्ता कळली असता ते व्यतीत झाले होते एकीकडे मंदिर वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं परंतु त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त करण्यामागे राजकारणी लोक यशस्वी झाले.
