राष्ट्रीय महामार्गावर कारेगाव फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला जोरदार धडक दुचाकीस्वार गंभीर जखमी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

दिनांक ६-३-२३ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान नागपुर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर कारेगाव फाट्यावर डोरला येथील मधुकर हिवरे वय ६२ वर्ष हे आपल्या मोटरसाइकलने काही कामाकरीता कारेगाव आले होते काम आटपुन कारेगाव येथुन वडकीकडे जात असतांना कारेगाव फाट्यावर विरुध्द दिशीने येणाऱ्या ट्रक क्रमांक टि.एन.३० बि.एल ९३०६ या ट्रकने मोटरसायकला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार मधुकर हिवरे हे गंभिर जखमी झाले या घटनेची माहिती एन.एच.आय.१०३३ वर काम करीत असलेले सलमान पठान व आकाश कोवे यांनी तातडीने जखमी मधुकर हिवरे यांना ऊपच्यारासाठी वडनेर येथील ग्रामिण रुग्नालयात दाखल केले.या घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला वडकी पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले.वृत लिहीत पर्यत पोलिस प्रशासनाकडुन पुढील महीती प्राप्त झालेली नाही.