गणरायाचे बुधवारी तर गौरीचे आगमन शनिवारी थाटामाटात होणार

(प्रतिनिधी. प्रवीण जोशी)

श्रावण महिना म्हणजे सणाची पर्वणीच तसेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी म्हणजेच बुधवारी ब्रह्म मुहूर्ता पासून पहाटे ४:४८ते दुपारी १:५४पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोईने घरातील स्थापित गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल अशी माहिती विनायक बनसोडे गुरुजी यांनी दिली. गणरायाच्या स्थापनेसाठी भद्रादी विष्टी कोणतेही सूयोग वर्ज करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना माध्यान्हा नंतर देखील करता येऊ शकते शनिवारी 3 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर दिवसभरात कधीही गौरी आव्हान करता येईल ज्येष्ठ नक्षत्र माध्यानी असलेल्या दिवशी पूजन करावे. असे असल्याने रविवारी 4 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचे असल्याने पाच सप्टेंबर रोजी रात्री ८:६पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.

या वर्षी ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे दहा दिवसाच्या गणपतीचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल अशी माहिती विनायक बनसोडे गुरुजी यांनी दिली पुढच्या वर्षी मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी श्री गणेश चतुर्थी आहे.