करंजी ( सो ) येथे पाणी-पुरवठा पाईपलाइन च्या कामाला सुरवात..!

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत करंजी ( सो ) येथे आज दि २/११/२३ रोजी जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण गावातील पाणी-पुरवठा पाईपलाइन च्या कामाला सुरवात झाली आहे.ही पाइपलाइन गावातील प्रत्येक गल्लीत टाकण्यात येईल व गावातील प्रत्येक घरी वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात येणार आहे
नव्याने झालेल्या पाणी पुरवठा टाकी मार्फत संपूर्ण गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्या करीता ही पाईप लाईन टाकण्यात येत असून भविष्यात कोणतेही कुटुंब पाण्या पासून वंचित राहणार नाही असे सरपंच प्रसाद ठाकरे यांनी सांगितले.