
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्याच्या राजकारणात शंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसे ने चांगलीच स्पेस निर्माण केली. तालुक्यातील अनेक गावातील युवकांना मनसे हा सक्षम पर्याय वाटायला लागला. सर्वसामान्य माणसाच्या विविध समस्यांना न्याय देत हे स्थान मनसे ने प्राप्त केले. याची दखल घेत शंकर वरघट यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली. मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मनसेत मोठे फेरबदल पाहावयास मिळाले असुन तालुकाध्यक्ष व सर्वच अंगीकृत संघटनांचे तालुकाध्यक्ष वगळता सर्व कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येवुन जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी दिनांक १ नोव्हेंबर ला सर्व कार्यकारिणी बरखास्त करून ६नोव्हेंबर ला नवीन कार्यकारिणी जाहीर करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
राळेगाव तालुक्यात मनसे ची चांगली हवा आहे. अनेक प्रश्न मनसे च्या दणक्याने सुटले. गावागावात मनसे च्या शाखा सुरु झाल्या शंकर वरघट हे नाव तालुक्यात सुपरिचित झाले. यामुळे मनसे ची ताकद तालुक्यात वाढली. मात्र काही ठिकाणी पक्षाच्या ध्येय धोरणाला गाल बोट लागणारी कृती घडतं असल्याच्या तक्रारी पुढे आल्या.त्यातच मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी नागपूर तेथील कार्यकारणी बरखास्त करून पक्षविरोधी कारवाई खपवुन घेतल्या जाणार नाही असा संदेश दिला. याचेच पुढचे पाऊल राळेगाव मध्ये पडल्याची चर्चा आहे. मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी १ नोव्हेंबर ला सर्व कार्यकारिणी बरखास्त करून ६नोव्हेंबर ला नवीन कार्यकारिणी जाहीर करून प्रतिक खिरटकर (राळेगाव शहर अध्यक्ष), सागर पोटफोडे( राळेगाव शहर उपाध्यक्ष), सुरज लेनगुरे (तालुका उपाध्यक्ष वडकी / वाढोणा सर्कल), अक्षय आडे( तालुका उपाध्यक्ष झाडगांव / वरध सर्कल), प्रविण देऊळकर (तालुका उपाध्यक्ष जळका / धानोरा सर्कल), नरेंद्र खापणे (राळेगांव तालुका संघटक), रोशन गुरुनुले( राळेगांव तालुका सरचिटणीस), अखिल शेख (सहसचिव राळेगांव तालुका), उमेश पेंन्दोर (कोषाध्यक्ष), राळेगांव तालुका, स्वप्नील नेहारे (तालुका प्रसिद्धी प्रमुख), करण नेहारे (तालुका उपाध्यक्ष वाहतूक सेना),
दिपक वरटकर (विभाग अध्यक्ष, खैरी सर्कल), विठ्ठल शेंडे (विभाग अध्यक्ष झाडगांव सर्कल) मयुर पारधी (विभाग अध्यक्ष धानोरा सर्कल), अमर आत्राम, (विभाग उपाध्यक्ष वाढोणा सर्कल),सचिन बोंडे (विभाग उपाध्यक्ष खैरी सर्कल), अमोल गेडाम
(विभाग उपाध्यक्ष वरध सर्कल),
विनोद जंबुळकार (विभाग उपाध्यक्ष वाहतूक सेना), गजानन बावणे (विभाग उपाध्यक्ष झाडगाव सर्कल) या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ शंकर वरघट, मनसे आर्णी तालुका अध्यक्ष सचिन येलगंधेवार, मनसे राळेगाव तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, मनसे वाहतूक तालुकाध्यक्ष आरीफ शेख, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष संदीप कुटे, तसेच पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
मनसे हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष आहे. हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल . राळेगाव तालुक्यात शंकर वरघट यांचे नेतृत्वात मनसे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून पक्ष वाढवत आहे याचा अभिमान वाटतो. पक्षाने अधिक मोठी जबाबदारी त्यांचेवर आता सोपविली आहे. राळेगाव तालुक्यात नव्या दमाचे शिलेदार कार्यकारणी मध्ये घेण्यात आले. येणाऱ्या निवडणुकीत मनसे ची कामगिरी दमदार असेल याची मला खात्री वाटते
देवा शिवरामवार
मनसे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ
