बिटरगांवसह बंदीभागातील शेतकरी रानडुकराच्या हैदोसामुळे झाले फक्कीला महाग

( पैनगंगा अभयारण्याच्या वन्य प्राण्यांमुळे सर्व शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत)


प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु )


उमरखेड तालुक्यातील बंदी भागाच्या शेजारी असलेल्या व सर्व शेतकऱ्यांना रानडुकरांचा नाहक त्रास वाढला आहे. सतत वर्षांनुवर्ष राबराब मेहनत करणारे शेतकरी आज पर्यंत कसेबसे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र हल्ली दोन वर्षापासून नीलगाय व रानडुकरांच्या संख्येमध्ये झपाट्याने भयानक वाढ झाल्यामुळे जंगलाकाठच्या शेतीसह सर्वच शिवारामध्ये वन्यप्राणी चारा शोधण्याकरिता वन्य प्राणी दररोज रात्रीच्या वेळेत येत असतात . प्रत्येक शेतकरी रानडुकरांच्या त्रासामुळे दररोज शेतामध्ये शेकोटी पेटवून आपापल्या शेत पिकाची राखण करतात. पण रात्रीला एखादा शेतकरी झोपला म्हणजे रानडुकराचा कळप जवळपास 100 ते 150 लहान मोठे डुकरे येतात व शेतीतील पीक खाऊन उभ्या पिकाची नासधूस करतात व सर्व शेती उध्वस्त केल्यामुळे रानडुकराच्या हैदोसामुळे शेतकरी हातबल झाला आहे. हल्ली ओलायतीचि पेरणी सुरू आहे चना पेरल्यावर त्याच रात्री जमिनीतला सर्व चना उखरुन खाऊन टाकत आहेत . त्याचप्रमाणे कापसाला सुद्धा खाऊन झाडे मोडून टाकत आहेत. दिवाळीचा सण काही दिवसातच येत आहे परंतु शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी शेतीतील पीक उध्वस्त केल्यामुळे फक्कीला महाग झाले आहेत. म्हणून शेतकरी वर्ग म्हणत आहे की पैनगंगा अभयारण्य वन्यजीवांसाठी कठोर नियमाची बजावणी करतात. तशीच वन्यप्राण्याच्या आन्न पाण्याची सुद्धा व्यवस्था वन्यजीव अभयारण्यात करावी. जर वन्य प्राण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वनविभाग असमर्थ ठरत असेल तर तुमच्या आळसपणाचे खापर गरीब दिनदुबळ्या शेतकऱ्यांच्या माथी फोडू नका.. एखाद्या नागरिकाचे पाळीव जनावर कोणाच्या शेतीचे पिक खाल्ल्यास त्या जनावराला घजेघाटा मध्ये नेऊन टाकतात. पण तुमचे वन्य जीवाचे प्राणी इतके शेतकऱ्याचे नुकसान करतात तर यांना कुठे टाकावं ह्या महत्त्वाच्या प्रश्नामुळे शेतकरी वर्ग त्रस्थित झाला आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी वन्यप्राणी यांच्यावर तात्काळ नियंत्रण करून जंगलाच्या संपूर्ण काठावर लोखंडी जाळीचे कुंपण करावे व वन्य प्राण्यांचा शेत शिवारात जाण्यापासून पाय बंद करावा अशी मागणी संपूर्ण शेतकरी करीत आहेत.