
“नाम” माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ हरीश इथापे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
येथे नाम फाउंडेशन च्या वतीने तसेच विदर्भ/खान्देशचे समन्वयक हरिष इथापे यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनातुन राळेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुंटूबातील ५४ लाभार्थीना दिं २८ मार्च २०२२ रोज सोमवारला प्रथम प्रशिक्षण संस्था राळेगांव येथे धनादेश वाटप करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे,निवासी नायब तहसीलदार बदकी गटविकास अधिकारी पद्माकर मडावी,तालुका कृषी अधिकारी मृणाल साठे,पोलीस निरीक्षक संजय चौबे, संगीता राठोड, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी नाम फाऊंडेशन विदर्भ / खान्देशचे समन्वयक इथापे म्हणाले की “नाम” हे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली चळवळ आहे असे मत या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून नाम वर्धा चे समन्वयक हरिष भगत होते. यावेळी भगत यांनी आपल्या प्रास्थाविकेतुन नाम उद्देश व कार्येप्रणाली काय याची विस्तृत माहीती दिली. तर कार्यक्रमाचे संचालन प्रथम चे समन्वयक प्रमोद कांबळे यांनी केले.तसेच
नाम फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक हरिष भगत तसेच आधार संघटनेचे अध्यक्ष तथा नाम वर्धा तालुका समन्वयक विक्रम खडसे, नाम चे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन पवार, राळेगाव तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक व राळेगाव तालुका समन्वयक गंगाधरजी घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी, शंकर नागतोडे, एकल महिला संघटनेच्या सयोजिका सरला वावधने यांच्या सहकार्यातून नियोजन बद्ध पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असून कार्यक्रमाचे आभार संदीप तत्रपाले यांनी मानले.
