मागील अकरा वर्षांपासून दर रविवारी करत आहेत परिसर स्वच्छ

संत गाडगे बाबांच्या विचारांचा वारसा घेऊन मागील अकरा वर्षापासून नगर सेवा स्वच्छता समितीच्या माध्यमातून दर रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा परिसर, वणी शहराचे आराध्य दैवत जैताई माता व साईबाबा मंदिर परिसरात दर रविवारी सकाळी स्वच्छता केला जात आहे. या स्वछता समितीच्या माध्यमातून आज हा उपक्रम दर रविवारी पहाटे पाच ते सात या वेळात “दोन तास गावासाठी” हे स्वच्छता अभियान करण्यात आले आहे. यावेळी नामदेवराव सेलवडे माजी सैनिक, दिनकर ढवस माजी मुख्याध्यापक, राजेंद्र साखरकर मुख्याध्यापक, राजू तुराणकर, विकास जयपूरकर यांनी आजच्या अभियानात सहभाग घेतला.
नगर सेवा स्वछता समिती हि शहरात स्वच्छता उपक्रम राबविणारी एकमेव सामाजिक संघटन आहे.