
प्रतिनिधी:- संजय जाधव
गेल्या कित्येक दिवसांपासून परशुराम देवस्थान,व अंगणवाडी क्रमांक ९ येथील दोन्ही खांबावरील पथदिवे बंद अवस्थेत असून ,नगर पंचायत व येथील नगर सेवक यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष्य आहे. हा रस्ता अतिशय रहदारीचा असून महादेव मंदिर देवस्थांकडे जातो.गावातील मुख्य महादेव मंदिर म्हणून प्रचलित असलेले मंदिर असून येथे भाविकांची बारा महिने रहदारी चालू असते.गावातील नागरिक इथे रात्री ९ते९:३० च्या दरम्यान दर्शनासाठी भाविक येत असतात .तर काही भाविकांची प्रातकाळी ४ वाजता पासून रहदारी चालू असते.भाविक भक्तांना महादेवाच्या दर्शनासाठी अंधारातून जावे लागत आहे.आता काहिदिवसातच श्रावण महिना येऊन ठाकला आहे.भाविकांची पहिल्या पेक्षा जास्त गर्दी वाढणार श्रावण महिन्यात सुद्धा भाविकांना अंधारातून जावे लागणार की काय?असे सद भक्तांनकडून बोलले जात आहे.हा रस्ता तर सिमेंट चा चांगल्या प्रकारे भावना ताई गवळी यांच्या प्रयत्नातून झालेला आहे.परंतु आजू बाजूला गाजर गवत,व ई. गवत सुद्धा आहे.त्यामुळे रस्त्याला विंचू, किड्यांची सुद्धा तेवढीच भीती आहे.त्यातच महिलांची तर पुरुष मंडळी पेक्षा अधिक प्रमाणात दर्शनासाठी रहदारी असते.त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच हा भाग थोडा गावाच्या बाहेर असल्या कारणाने इथे चोरी व डकायतीचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. या करिता त्वरित नगर पंचायत ने व नगर सेवकाने या कडे लक्ष्य देण्याची गरज आहे.
