

सहसंपादक : रामभाऊ भोयर
पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ व पंचायत समिती राळेगाव यांचे संयुक्त विद्यमाने दिं १६ मार्च २०२५ रोज रविवारला पंचायत समिती कार्यालय राळेगाव येथे कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ७:३००ते दुपारी ४:०० या वेळात तालुकास्तरीय भव्य पशु पक्षी प्रदर्शनी व पशु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनी व पशु मेळाव्याचे उद्घाटन ठीक ११ वाजता होणार असून या तालुकास्तरीय भव्य पशु पक्षी प्रदर्शनी व पशु मेळाव्याला उद्घाटक उद्घाटक मा. ना. संजय राठोड मृद व जलसंधार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा, तर अध्यक्ष म्हणून मा.ना. प्रा. डॉ अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, तर प्रमुख अतिथी म्हणून मा.ना. इंद्रनील नाईक राज्यमंत्री उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च तंत्रशिक्षण आदिवासी विकास, पर्यटन मृद् व जलसंधारण महाराष्ट्र राज्य हे लाभणार आहेत.
तसेच कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा.संजय देशमुख लोकसभा सदस्य यवतमाळ वाशिम मतदार संघ, मा.श्रीमती प्रतिभा धानोरकर लोकसभा सदस्य चंद्रपूर मतदारसंघ, मा.नागेश पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य हिंगोली मतदारसंघ , मा.श्रीमती भावनाताई गवळी विधान परिषद सदस्या, मा .किरण सरनाईक विधान परिषद सदस्य मा.राजू तोडसाम विधानसभा सदस्य मा.धीरज लिंगाडे विधानसभा सदस्य मा. अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर विधानसभा सदस्य मा .संजय दरेकर विधानसभा सदस्य मा.किसन वानखेडे विधानसभा सदस्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तर या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण दुपारी २:०० वाजता होणार असून या बक्षीस वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी यवतमाळ, मंदार पत्की मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, विशाल खत्री सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव, डॉ यिसुदेव वंजारी प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त अमरावती विभाग,संतोष धोत्रे अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, विजय राहटे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यवतमाळ, डॉ क्रांती काटोले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, तरी तालुक्यातील जनतेने या तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनी व पशु मेळाव्यात आपली जनावरे व पशुपक्षी घेऊन यावे व लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.धनश्री डिडोळकर सह आयुक्त पशुसंवर्धन घाटंजी ,केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव,डॉ प्रवीण वानखेडे पशुधन विकास अधिकारी वडकी, श्रीमती भारती इसळ सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, डॉ.अमेय गुप्ते पशुधन विकास अधिकारी वरध, सुरेंद्र म. हाडोळे पशुधन विकास अधिकारी विस्तार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी वृंद पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व पशुसंवर्धन विभाग पंचायत पंचायत समिती राळेगाव यांनी केले आहे.
