
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड व छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव 2023 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे उद्घाटक माजी महापौर जयश्रीताई पावडे प्रमुख पाहुणे डॉ. रेखाताई चव्हाण सिनेट सदस्य शिवाजी चांदणे वैजनाथ भाऊ देशमुख माजी सिनेट सदस्य उद्धवराव हंबर्डे, रामचंद्र शेंबोले हे होते कार्यक्रमास प्रमुख वक्ता माजी शिव-यारव्यता तथा सुचिता जोगदंड या होत्या.
कार्यक्रमास जिजाऊ व्याख्यानमाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ ज्ञान मंदिर प्राचार्य ममता पाटील प्रस्ताविक भास्करराव हंबर्डे तर आभार प्रदर्शन संतोष भाऊ बारसे यांनी केले.
या कार्यक्रमास जिजाऊ वेशभूषा केलेल्या अनुष्का हंबर्डे व इतर कन्यारत्नांचा सत्कार करण्यात आला तसेच मनीषा वडजे, सै. माधुरी हंबर्डे,सत्यभामा बारसे, सुचिता चांदणे,श्रीदेवी पाटील, मेघा इटंधाळकर
सौ.संतोषीताई वर्मा,सौ.आशाताई धुले यांचा कर्तुत्वान महिला म्हणून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक भास्करराव हंबर्डे सौ.माधुरी हंबर्डे हे होते. कार्यक्रमास खुशालराव डाकोरे, राघोजी जोगदंड, तुतारी वादक सुरेश कधारे इत्यादींनी परिश्रम घेतले.
