
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेत यवतमाळ येथील मनोरुग्णांना आधार देणाऱ्या नंदादीप फाऊंडेशन च्या सदस्यांनी भेट दिली व त्यांचे कार्य सर्वांना पटवून दिले. यावेळी विद्यार्थी तसेच सर्व कर्मचारी वृंद यांचेकडून तीन हजार शंभर रुपये निधी मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी व्हि. एन. लोडे पि.पि. आसुट कर आर एस वाघमारे बी. बी. कामडी व्हि टी दुमोरे एस एम बावणे एस वाय भोयर उपस्थित होते. सहकार्याबद्दल सदर सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
