
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पवनार येथील वॉर्ड क्र. १ रहीम ले आऊट येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत दि.२२ जुलै ते २८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज दि.२७ जुलै रोजी इको क्लब उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,त्यानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम आणि शालेय पोषण आहार दिवस उपक्रम साजरा करण्यात आला. शाळा परिसरात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाजीराव हिवरे,उपाध्यक्ष श्रीमती रोशनी महेंद्र पेटकर, सदस्या सपना सुनील देवतळे,सुवर्णा शैलेश देवतळे, दीक्षा विकास गायकवाड,आशा मेश्राम,श्रीमती वैशाली प्रितेश पाटील, श्री प्रमोद बापूराव बोरकर, ईश्वर डोळसकर, उमेश सुरेभांन नगराळे, गणेश मेश्राम, गणेश हिवरे, कु. वीरा खंते,ओम बेलखेडे, पालक वर्ग,शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी इत्यादी च्या उपस्थित आंबा,चिंच, कडुनिंब,वड, पेरू, डाळिंब,बोर,लिंबु, पिंपळ,गुलमोहर,करंजी, जांभूळ, इत्यादी वृक्षांचे शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून वृक्षसंवर्धन करण्याची गरज असून होणारी वृक्ष तोड थांबविणे काळाची गरज आहे असे अध्यक्ष बाजीराव हिवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,कोरोना काळात वृक्षांनी आम्हा सर्व प्राणी मात्राना ऑक्सिजनची काय गरज असते हे त्या काळात समजून दिले.असे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया हेडाऊ यांनी उपस्थितांना संबोधित केले.वृक्ष या भूतलावर नुसते सावलीच देत नसून प्राणवायू ऑक्सिजन सुधा मोठ्या प्रमाणात देते आज सगळीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे,पण त्याबदल्यात एकही झाड लावण्याचे सौजन्य करत नसल्याकरणा मुळे उष्णतेचे प्रमाण दिवसें दिवस वाढत चाललेले आहे त्यामुळे सर्वांनी किमान एक तरी झाड दरवर्षी लावावे अशी विनंती जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा पवनार च्या चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनी च्या वतीने करण्यात आले.त्या सोबत शालेय पोषण आहार दिवस उपक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका मनीषा तडस यांनी केले तर सूत्र संचालन सहाय्यक शिक्षिका ताई केंद्रे यांनी केले आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिक संजय पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन समिती च्या सर्व पदाधिकारी, पालक वर्ग, शिक्षक वृंद,विद्यार्थी, विद्यार्थिनी, इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.
