
वरोरा तालुक्यातील बोर्डा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ऐश्वर्या वसंता खामनकर यांच्यावर १६ जानेवारी रोजी अविश्वास प्रस्ताव १० विरुद्ध २ मतांनी पारित झाला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी घेण्यात आली,.
बोर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सोमवारी दिनांक १२ फेब्रुवारी ला पार पडलेल्या निवडणुकीत राहुल ठेंगणे निवडून आले. एकूण १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत १० मते ठेंगणे यांना मिळाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे उमेश रमेश देशमुख यांना ३ मतावर समाधान मानावे लागले.. सरपंचपदी राहुल ठेंगणे यांची निवड झाल्यानंतर कृउबास सभापती डॉ. विजय देवतळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छदेऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संचालक बाळू भोयर, गणेश रावले, अभिजित पावड़े आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
