उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅराथॉन दौड स्पर्धा

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे,वणी

मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅराथॉन दौड स्पर्धा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२७ जुलै २०२१ रोजी मंगळवारला शिवाजी चौक वणी येथे सकाळी ७ वाजता भव्य मॅराथॉन दौड स्पर्धा वणी शिवसेना शहराच्या वतीने शहर प्रमुख राजु तुराणकर यांनी आयोजित केली होती ही स्पर्धा ओपन गट मुले – मुली व १८ वर्षा आतील मुले – मुली अशा दोन गटात घेण्यात आली. प्रत्येक दोन्ही गटातील १० मुले – मुली विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदिरा सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष तथा वणी विधानसभा शिवसेना संघटक सुनिलभाऊ कातकडे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर तर कार्यक्रमाचे आयोजक राजु तुराणकर अजिंक्य शेंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून खेळाडूंना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. लगेच बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ललित लांजेवार, मंगल भोंगळे, महेश पहापळे, प्रा. दिलीप मालेकर सर, संतोष बेलेकर सर कार्यक्रमाचे संचालन सागर जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन ललित लांजेवार यांनी मानले.