
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राजकोट किल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रकरणी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी व त्या ठिकाणी योग्य नियोजनासह युगपुरुष शिवाजी महाराज यांचा पुतळा करण्यात यावा अशी मागणी
राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (AP) च्या वतीने करण्यात आली. राळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शीवतीर्थ येथे पूजना नंतर तहसीलदार यांना या बाबत निवेदन देण्यात आले
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे.या घटनेचा राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करण्यात आला
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करतांनाच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यात यावी सोबतच यात जे कोणी दोषी असतील त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी. सोबतच दैदीप्यमान इतिहास असणारे,नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी योग्य नियोजनासह उभारण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी (AP) पक्षाचे तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.या वेळी. राष्ट्रवादी अजित पवार गट तालुका अध्यक्ष शशिकांत धुमाळ मुर्तीजाभाई बब्बर कैलास धतकर कार्तिक धतकर भारत धतकर रउफ शेख गिरधर ससनकर पराग मानकर शुभम कांबळे संजय कासेकर सौरभ वानखेडे सुरज डायरे रवींद्र संदलवार किशोर नाखले महादेव लांबाडे प्रभाकर भगत अक्षय पडोळे लोभेश राऊत अनिकेत सोनतापे गौरव शिंदे घनश्याम शिंदे मोहन पावडे साहिल पुढके विक्रम मेश्राम अन्वर भाई आधी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते