जि.प.,पं. स. निवडणूक- भाजप व काँग्रेसची परिक्षा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विधानसभा निवडणूकीत गावनिहाय मतदान संख्येने स्थानिक नेत्यांची ताकद स्पष्ट झाली आहे. त्या आधारावर आकडेमोड करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जय, पराजयाची गणिते मांडली जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पक्ष, नेते व इच्छुक कामाला लागले असल्याचे चित्र आहे. या तालुक्यावर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी विधानसभेत सलग तिसऱ्यांदा भाजपचे आमदार आहे. जिल्हा परिषद मध्ये गतवेळी तिन्ही जि.प. व पंचायत समितीमध्ये सहा पैकी तिन जागांवर भाजपचे सदस्य निवडून आले होते. सुरुवातीस काँग्रेसचे तर अडीच वर्षानंतर भाजपचे सभापती व उपसभापती होते. महायुती व महाविकास आघाडी या सर्व जागा सहयोगी पक्षांना वाटा देऊन लढते की एकटे लढतात यावर महायुती व महाविकास आघाडी या निवडणुकीत कायम राहते की तुटते हे अवलंबून राहणार आहे. इतर पक्षाचे अस्तित्व कमजोर असल्याने त्यांची दखल मोठे पक्ष व त्यांचे नेते घेणार नाहीत, अशीच दाट शक्यता आहे. सहाही पक्ष वेगवेगळे लढले तर परिणाम मात्र वेगळे राहू शकतात एवढे मात्र निश्चित.
————–
जळका 1018, वरध 335 मतांची काँग्रेसला तर वडकी गणात भाजपला 100 मतांची आघाडी मिळाली आहे.
या समीकरणाचा फायदा भाजपला होतो की काँग्रेसला होतो हे निवडणूकीपूर्वी आरक्षण व निवडणूक काळात उमेदवार घोषित झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
——————–
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना गटनिहाय मिळालेली मते –
जळका –
भाजप – 8697
काँग्रेस – 9715
वरध –
भाजप – 8924
काँग्रेस – 9259
वडकी –
भाजप – 8817
काँग्रेस – 8717
—————–
पूर्वी आरक्षण काढण्यात आलेले आरक्षण कायम राहणार की नव्याने निघणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण बदलल्यास मात्र इच्छुक उमेदवारांचा चांगलाच भ्रमनिरास होणार आहे. ओबीसी आरक्षणाबद्दलचा न्यायालयीन तिढा कसा सोडविल्या जातो, यावरही बरेच काही अवलंबून आहे.
—————
जिल्हा परिषद गटाचे आरक्षण –
जळका ना.मा.प्र., वडकी सामान्य, वरध सामान्य.
पंचायत समिती गणाचे आरक्षण – जळका सामान्य महिला, धानोरा सामान्य, वडकी अनुसूचित जमाती, वाढोणा बाजार अनुसूचित जमाती महिला, वरध सामान्य, झाडगाव नामाप्र महिला.
दोन जिल्हा परिषद गट सामान्य व एक जिल्हा परिषद गट नामाप्र साठी राखीव असल्याने बहुतांश राजकीय पक्षाकडून इच्छुक खुश असून ते निवडणूक लढण्याच्या तयारीत आले आहे. विधानसभा निवडणुकीत म्हणूनच यापैकी अनेकांनी आपापल्या क्षेत्रात प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
गतवेळी तिन जिल्हा परिषद गटावर भाजपचे सदस्य निवडून आले होते.
पंचायत समिती गणात धानोरा व वरध हे दोनच गण खुले आहे. इतर चार विविध प्रबर्गासाठी राखीव आहेत. या चारही जागा महिलांसाठी राखीव आहे. आरक्षण कायम राहिल्यास सभापती व उपसभापती पदी सुद्धा महिलांचीच वर्णी लागून महिलाराज येऊ शकते.