महाराष्ट्ट नवनिर्माण वाहतुक सेनेच्या शाखा फलक अनावरण संपन्न
(वाहतुक सेना महाराष्ट् राज्य सरचिटणीस आरिफ शेख यांनी केले वाहन मालक चालकांना मार्गदर्शन)

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शाखेच्या फलकाचे अनावरण सरचिटणीस आरिफ शेख यांच्या हस्ते वडकी येथे पार पडले असून यावेळी त्यांनी उपस्थित वाहन चालक,मालकांना मार्गदर्शन केले.
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना शाखा स्थापना व फलक अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी उद्घाटक म्हणून राज्य सरचिटणीस आरिफभाई शेख हे होते ते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपाध्यक्ष इराशाद खान हे होते यावेळी आरिफ शेख यांना वाहन मालक,चालकांना नवीन कायदा किती घातक असुन यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे शासनाने या कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.तर राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना नेहमीच वाहन चालक ,मालकांच्या हक्कासाठी लढत असुन कायम वाहन मालक व चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली. यावेळी मनसे रुग्ण सेवा केंद्राचे अध्यक्ष,माजी नगरसेवक धनंजय त्रिंबके,मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुका उपाध्यक्ष सुरज लेनगुरे, रोशन गुरुनुले, संदीप कुटे, दिपक वरटकर, जिवा बुरडकर, नवनियुक्त मनसे वाहतुक सेना जिल्हा उपाध्यक्ष आरीफ शेख, वाहतुक सेना तालुकाध्यक्ष स्वप्नील नेहारे, तालुका उपाध्यक्ष धिरज गाऊत्रे, तालुका उपाध्यक्ष भारत निंबुळकर, सरचिटणीस उमेश पेंन्दोर, चिटणीस अखिल शेख, विभाग अध्यक्ष वडकी आकाश पाटील, विभाग उपाध्यक्ष कपील मेश्राम, शहर संघटक ओम मडावी, कलंदर पठान, फारुख शेख, गणेश नागोसे, करण नेहारे, सिकंदर पठाण,अमोल केराम, मोहन नवले, सुरेश वसाते, सुरज मोहुर्ले यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.