एकतर्फी प्रेमातून तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.प्रेमाला नकार दिल्याच्या रंगात अल्पवयीन मुलीच्या घरी जात तुच्छ अंगावर पेट्रोल टाकल्याची घटना घडली ,या घटनेदरम्यान अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी त्या आरोपी सिध्दांत भेले वय 22 वर्ष याला पोलीसानी अटक केली आहे.न्यायालयाने त्याला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सूनावली आहे.

आरोपी सिध्दांत भेले व अल्पवयीन तरुणी हे एकच भागातील रहिवासी होते.आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाचा प्रस्ताव दिला परंतु तो तिने नाकारल्याने आरोपीच्या मनात कट कारस्थान शिजत होते.आरोपीने पेट्रोल टाकून जाळण्याचे डोक्यात आणले.एका बाटली मध्ये पेट्रोल भरून प्रेयसीच्या अंगावर टाकताना घरच्यांनी अल्पवयीन तरुणीला बाजूला केल्याने तरुणी थोडक्यात बचावली.