


सहसंपादक-रामभाऊ भोयर
डॉ. मरियम अस्लानी (Maryam Aslany) या ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापिका आहे, मरियम व तिचे सहकारी, भारतीय शेती व शेतकऱ्यांवर एक Documenty बनवत आहे. खास करून कापुस उत्पादक शेतकरी हा त्यांच्या मुख्य विषय आहे.
राळेगाव व कळंब तालुक्यातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व सावकारग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मुलाखती घेतल्या .शेळी ता. राळेगाव येथे एका सावकारग्रस्त कुटुंबा कडे गेले कुटुंबाचे अनुभव समजण्या आधीच डॉ. मरियम च्या डोळ्यात पाणी आले. ना भाषा आपली, ना लोक आपले, ना अनुभव आपले, तरी डोळ्यात पाणी, चेहरे वाचून लोकांच्या वेदनेचा अंदाज मरियमला आला. २ तासापेक्षा जास्त वेळ संवाद एका व्यक्ती सोबत करायची. असंख्य प्रश्न विचारून शेतकऱ्यांच्या वेदना तिने समजून घेतल्या.
कापसाची विक्री प्रक्रिया समजून घेण्याची तिची इच्छा होती. म्हणून राळेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला तिने भेट दिली जिनिंग ला भेट देवून गठानी विक्री पर्यंत ची प्रक्रिया भर उन्हात ती समजुन घेत होती, वेदना समजण्यासाठी कधी कधी स्वतः वेदना सहन कराव्या लागतात, असं हीचे तत्वज्ञान आहे.
शेतकऱ्यांच्या कापसाच्या लिलावा प्रसंगी लीलावात शेतकऱ्यांचे भाव कमी जास्त होत होते, तेव्हा ही प्रचंड नाराज होत होती. कोणता व्यापारी कमी भावात कापुस खरेदी करत आहे, हे तिने निरिक्षणातून ओळखले होते.
या दरम्यान दिला मदत करणारे समीर रासेकर (राजूर जि. चंद्रपूर), कुणाल पुरोहित (मुंबई) हे दोघे जण तीच्या सोबत होते
भूषण उंडे, गणेश बोरकर एड वैभव पंडित तीला कापूस उत्पादक शेतकरी, अडचणी, भाव, हवामान बदल, व सरकारी धोरण व परिणाम. या बद्दल चे आमचे अनुभव तीला सांगितले.
बाजार समितीमध्ये कास्तकारा सारखा पेहराव केलेले एड वैभव पंडित सुद्धा होते इंग्रजीत संवाद असल्यामुळे लोक त्यांच्याकडे कडे सुद्धा तेवढाच कौतुकाने पाहत होती. इंग्रजी बोलणारा शेतकरी कोण याची चर्चा होती.
कापूस विकण्याकरता आलेले शेतकरी मरियम जवळ मराठी मध्ये आपल्या भावना व्यक्त करत होती. काही लोक म्हणायची आज APMC मध्ये वेगळं वाटत आहे. एक शेतकरी म्हणाला, आमच्या शी कोणी तरी बोलत याच बर वाटत आहे. एक अडता माझ्या काना जवळ येवून म्हणाला “मॅडम, मुळे आज भाव १०० रुपये जास्त राहिले.”
ती पुन्हा येणार आहे….. कापसाची टोबनी अनुभवायला. दरम्यान त्यांची भेट होणार आहे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व प्रशासक कैलास खटारे यांना सूचना देण्यात आली होती भेटीदरम्यान प्रशासक व सचिवांशी चर्चा होऊ शकली नाही.
