कविता शिवाजी नारमवाड च्या खुनातील फरार आरोपीस दोन महिन्यानंतर अटक

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

दि. 21/07/2023 रोजीच्या रात्री ढाणकी येथील कविता शिवाजी नारमवाड हीचा पती नामे शिवाजी दशरथ नारमवाड वय 32 वर्ष रा. चिंचाळा ता. भोकर जि. नांदेड याने धारदार सुरा तीच्या गळ्यात खुपसुन तीचा निर्गुण खुन केला होता. तीची बहिण नामे बनिता गजानन दुप्पलवाड वय 35 वर्ष रा. खरुस ता. उमरखेड जि. यवतमाल हिचे जबानी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन बिटरगाव येथे अप क्रं. 278 /2023 कलम 302 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला होता.

गुन्ह्यातील आरोपी नामे शिवाजी दशरथ नारमवाड वय 32 वर्ष रा. चिंचाळा ता. भोकर जि.नांदेड घटनेच्या रात्री पासुन फरार झाला होता त्याचा त्याचे मुळ गावी चिंचाळा ता. भोकर जि. नांदेड, हिमायनगर, भोकर, औरंगाबाद, अदिलाबाद, नागपुर, म्हैसा, मुंबई, या ठिकाणी विविध शोध पथके रवाना करुन शोध घेतला असता तो अद्यापपर्यंत मिळुन आला नव्हता आरोपी हा मोबाईल वापरत नसल्यामुळे तसेच तो त्याचे कोणत्याही नातेवाईकांसोबत संपर्क करत नसल्याने त्याचा शोध लागणे कठीण झाले होते.

आज दि. 02/09/2023 रोजी नेमण्यात आलेल्या गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, शिवाजी दशरथ नारमवाड हा त्याचे गावाकडील शेतामध्ये लपुन बसला आहे. अशा माहीतीच्या आधारे शोध पथकासह रवाना होऊन ग्राम. चिंचाळा ता. भोकर जि. नांदेड येथे रवाना होवुन भोकर पोलीसांची मदत घेऊन चिंचाळा येथील आरोपीच्या शेतात जाऊन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस अटक करुन पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड साहेब यवतमाळ, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पियुष जगताप साहेब यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदिप पाडवी साहेब उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार स.पो.नि. सुजाता बन्सोड, पोउपनि शिवाजी टिपुर्णे साहेब, ना. पो. काँ/2071 मोहन चाटे, ना. पो. काँ/2324 गजानन खरात, पो. काँ/2414 निलेश भालेराव, पो, काँ/1017 दत्ता कुसराम, पो. काँ/ 1022 शरद चव्हाण, प745 दत्ता कवडेकर, पो, काँ/ 1384 प्रकाश केंद्रे.म. हो. 1222 चंद्रमणी वाढवे पो.स्टे. बिटरगाव यांनी केली. पुढील तपास स.पो.नि सुजाता बन्सोड ठाणेदार पोलीस स्टेशन बिटरगाव ता. उमरखेड जि. यवतमाळ करत आहेत..