आजाद समाज पार्टी ढाणकी शहराध्यक्षपदी गोलू मुनेश्वर यांची निवड, ( उपाध्यक्षपदी धम्मपाल गायकवाड, महासचिवपदी समाधान राऊत यांची निवड )



ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी


आंबेडकरी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले भीम आर्मी प्रमुख तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ऍड चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील तरुणांनी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 24 जून रोजी संपन्न झालेल्या बैठकीत पक्षप्रवेश घेतला,
आजाद समाज पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टीभाऊ विणकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे जिल्हा सचिव आत्माराम आडे तालुकाप्रमुख देवानंद पाईकराव यांच्या उपस्थितीत , ढाणकी शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली, गेल्या दशकापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते
काशिनाथ उर्फ गोलू भाऊ मुनेश्वर ढाणकी शहराध्यक्ष,पदी
समाधान राऊत ढाणकी शहर महासचिव पदी
धम्मपाल गायकवाड उर्फ आबा, ढाणकी शहरउपाध्यक्ष पदी
इत्यादी कार्यकर्त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवड झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय जिल्हाध्यक्ष जॉन्टी भाऊ विणकरे, जिल्हा महा सचिव संतोष जोगदंडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भाऊ राऊत यांना दिले आहे,