आजनसरा बॅरेज” प्रकल्पाच्या कामास गती द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२ महिन्यात प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे दिले होते आश्वासन.

हिंगणघाट:- २६ नोव्हेंबर २०२३
वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीवर हिंगणघाट तालुक्यात असलेल्या “आजनसरा बॅरेज” प्रकल्पास सन २०२३-२४ आर्थिक नियोजनात निधी देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२/१०/२०२३ ला आजनसरा या गावी सदर प्रकल्पाचे कामे ०२ महिन्यात सुरू होईल असे आश्वासन दिले असून त्यानुसार प्रकल्पाच्या कामास गती देण्यात यावी व प्रकल्पास आवश्यक निधी देण्यात यावे अशी मागणी भेटी दरम्यान करण्यात आली.त्यावेळी सोबत हिंगणघाट कृ.उ.बा.सचे सभापती ॲड.सुधीर कोठारी, इंटकचे सेक्रेटरी आफताब खान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाने उपस्तीत होते.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा पत्र देण्या आले आहे.
वर्धा जिल्हयातील हिंगणघाट तालुक्यातील प्रसिध्द श्री.संत भोजाजी महाराज यांचे देवस्थान असलेल्या आजनसरा या गावाजवळील वर्धा नदीवर नियोजीत आजनरारा बॅरेज प्रकल्प यास २००० मध्ये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली व तत्कालीन मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते ०६ एप्रिल २००१ रोजी प्रकल्पाचे भूमिपुजन झाले, परंतु ५ वर्षापर्यंत निधीअभावी कामाला सुरूवात झाली नसल्याने २००६ मध्ये रू.२०८.४२ कोटी करीता नव्याने प्रशासकीय मान्यता घेण्यात आली.
या प्रकल्पाअंतर्गत नदीचे पात्रात कॉक्रीट बॅरेज प्रस्तावीत असुन नदीचे दोन्ही बाजुला मातीचा बंधारा, बॅरेजवरील बाजुस जॅकवेल, रायझिंग मेन, वितरण हौद व दोन मुख्य कालवे बंदनलिका वितरण प्रणालीसह प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाव्दारे हिंगणघाट तालुक्यामधील ६१ गावांतील २४०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच हिंगणघाट तालुक्यामधील १२ गावांना पिण्याचे पाणी पुरविण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पास आतापर्यंत १२.३७ कोटी निधी प्राप्त झालेला असुन तो निधी वनमान्यता करिता खर्च झालेला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत एकुण ३१.५६ हे. वनजमिन बाधीत होते. वनजमिन प्रस्तावास प्रगतीब नव एव जलवायु मंत्रालय यांचे नागपुर येथील केंद्रीय कार्यालयाने २७.०५.२०२२ ला अंतिम मान्यता प्रदान प्राप्त आहे.
या योजनेस केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळणेसाठी आवश्यक कार्यवाही प्रगती पथावर आहे. प्रकल्पाकरिता ९६.०७ दलघमी पाणीवापराचे नियोजन असुन पाणी उपलब्धता प्रमाणपत्रास मंजुरी प्राप्त आहे.
हिंगणघाट तालुक्यात सिंचनाची व्यवस्था नाही. सदर भागातील शेती पुर्णपणे कोरडवाहु आहे. सदर प्रकल्पामुळे ६१ गावांतील शेतक-यांना सिंचनाचे पाणी मिळणार असल्याने शेतक-यांना सिंचन सुविधा पुरविण्याचे दृष्टिने सदर प्रकल्प त्वरीत पुर्ण करणे आवश्यक आहे. २२ वर्षाचा कालावधी होवुन सुध्दा सदर प्रकल्प सुरू झाला नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे. शेतकरी हा प्रकल्प त्वरीत सुरू होण्याची व पुर्ण होण्याची अपेक्षा करीत आहे. प्रकल्पाच्या कामास गती देण्यात यावी, तसेच प्रकल्पास आवश्यक निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
तरी सदर प्रकल्प सुरू होण्याचे दृष्टिने आपण हस्तक्षेप करावा व प्रकल्पाचा कामास गति देण्याकरीता सन २०२३-२४ च्या राज्याच्या आर्थिक नियोजनात प्रकल्पास निधी देण्यात यावा अशी मागणी त्यावेळी करण्यात आली.