वरोरा :- वरोरा शहरातील माढेळी नाका येथे सरकार ग्रुप चा ट्रक क्रमांक MH34BG6694 य गाडीने रस्त्याचा बाजूला असलेल्या महावितरण कंपनीच्या लघुदाब वाहिनीच्या तीन लोखंडी खंब्याचे, विद्युत वाहिनी साहित्याचे 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 सुमारास नुकसान केले. ट्रक चालक, मालकाकडे कायद्यात असलेल्या नियमानुसार नुकसान भरपाई ची मागणी नाकरल्याने दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.
वरोरा येथील माढेळी नाका येथून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला एका नागरिक ग्राहकाने दूरध्वनी क्रमांकाने सांगितले की एक सरकार ग्रुप ट्रक डॉ. चतूरकर यांच्या दवाखाण्या जवळ असलेल्या विद्युत खांबाला ट्रकने ठोस मारून खांब तोडला. खांबावर असलेल्या विद्युत तारा तुटून नागरी येथे जाणाऱ्या महामंडळ बस वर एका सायकल स्वार मुलाचा अंगावर पडली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने विद्युत पुरवठा बंद करीत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दगड भरलेला ट्रक क्रमांक MH34BG6694 याने महावितरण कंपनीच्या लघुदाब वाहिनीच्या लोखंडी खांबाला ठोस मारून मागे ओढत नेल्यामुळे इतर दोन पोलची ही नुकसान झाले. या विद्युत तारा बसवर, ट्रकवर पडलेल्या आढळले. महावितरण कंपनीच्या असलेल्या नियमानुसार नुकसान भरपाई बाबत ट्रकचालक, मालकाला सांगण्यात आले. तरीही ते न भरल्यामुळे दि. 15 नोव्हेंबरला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 281, 125, भारतीय विद्युत अधिनियम ( सुधारणा )2023 चे कलम 139 नुसार गुन्हा नोंदविला.
बॉक्स मध्ये घेणे
विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी साहित्य वायर विद्युत ग्राहकांचे सर्विस वायर असे मिळून एक लाख तीस हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे. त्यात तीन लोखंडी खांब, लागणारे विद्युत तार, लोखंडी साहित्य तसेच विद्युत ग्राहकांचे सर्विस वायर असा समावेश आहे.