
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
बेंबळा धरणाचे पाणी कालव्यात सोडण्यात यावे यासाठी सर्व संबंधित शेतकरी बंधूनी सोमवार दिनांक ५/२/२०२४ ला कार्यकारी अभियंता बेंबळा कालवे विभाग यवतमाळ पाटबंधारे हाॅल दाते काॅलेज जवळ यवतमाळ येथे ठीक दुपारी १२ वाजता यावे.तेथे पाणी सोडण्याबाबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात येईल यासाठी सोबत आपले आपले पाणी मागणी अर्ज घेऊन यावे असे आवाहन सुधीर जवादे,बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
