
प्रतिनिधी:प्रवीण जोशी
ढाणकी
फसवणुकीच्या प्रकारामुळे मल्टीस्टेट वाल्यांना ठेवीसाठी अल्प प्रतिसाद मिळत आहे.ठेवीच्या स्वरूपात त्यांच्या भिकार चोट यंत्रणेच्या वाडग्यात कोणीही गुंतवणूक करायला तयार नाही. नामांकित असलेल्या एका मल्टीस्टेटचा उतरता आलेख असल्याच ऐकिवात आहे. मार्च महिन्यानंतर जी प्रगती पुस्तिका छापण्यात आली त्यामध्ये चढता हा खोटारडा उल्लेखही केल्याची चर्चा आहे. तर पहिल्या दहा मध्ये ढाणकी शहरातील एका नामांकित पतसंस्थेचे नाव सुद्धा त्यात नाही यावरून त्यांची सत्य परिस्थिती काय हे सांगायला कोण्या अर्थतज्ञाची ची गरज नाही सर्वसामान्य गुंतवणूकदार जाणून आहेत. त्यांच्या ढाणकी, उमरखेड, महागाव या ठिकाणी शाखा असून त्यात आर्थिक स्फोट होऊ शकतो. गुंतवणूकदारांनी आत्ता जर वाट बघितली आणि आपल्या ठेवीच्या रकमेची मुदतपूर्व रक्कम काढल्यास आपल्याला फटका बसू शकते असं समजून ती तशीच ठेवली तर मोठी आर्थिक हानी होऊ शकते. अनेक ठेवीदार मोठ्या प्रमाणात रक्कम काढत आहेत.
अधिक व्याजदरच्या आमिष दाखवून जागोजागी व शहरातील ही यंत्रणा गाव खेड्यापर्यंत पोहोचली. अधिक व्याजदरच्या मोहपशात रक्कम गुंतवायला लावून फसवणूक करण्याचा धंदा जोरात सुरू असताना ती रक्कम बुडाली म्हणजे कधी परत मिळेल काही सांगता येत नाही. तरी पण लोक या बुडवणाऱ्या भामट्यांच्या फसव्यगिरीला बळी पडतात.
ढाणकी शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात मल्टीस्टेट वाल्याने दुकानदारी थाटली होती. त्यातील राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने आपला गाशा गुंडाळला तर एक आरडी एजंट पळून गेला तो आपलाच व्यक्ती आहे व कसा तरी उदरनिर्वाह करेल या आशेने सर्वसामान्यांनी आपल्या रोजच्या कमाईतील फुल नाही फुलाची पाकळी देऊन त्याला उदरनिर्वाहाचे एक साधन काही तरी होईल या हेतूने दैनंदिन आवर्त ठेव सुरू केली होती. पण मल्टीस्टेटच्या गलथान कारभारामुळे व वसूलकर्त्याच्या गद्दारीपणामुळे सर्वसामान्यांची रक्कम मात्र फुकट गेली. आता मात्र त्याचा नाहक त्रास एक एक रुपया जमा करणाऱ्या व्यक्तींना होत आहे. जो आरडी एजंट रक्कम घेऊन पळून गेला त्याची हे सर्व काम व घोळ एकट्यानेच करायची कमालच म्हणावी लागेल. की जो व्यक्ती रक्कम घेऊन पळून गेलाय त्याचा किंतु परंतु असा कोणत्याही प्रकारचा तपास लागत नाही हे आश्चर्य म्हणावे लागेल.या प्रकरणाचा छडा लागल्यास त्यात आणखीन कोणी आहे का याचा सुद्धा उलगडा होऊ शकते. पण संबंधित पतसंस्था व प्रशासनाची उदासीनता यात दिसून येते.ती कचखाऊ वृत्ति नेमकी कशामुळे?? जो व्यक्ती रक्कम घेऊन पळून गेला त्याचा हेच काम करणाऱ्या व “मिठा” बोलणाऱ्याशी काही संबंध आहे किंवा महागुरू असू शकते तेव्हा याचा उलगडा झाल्यास स्वतःला व स्वयंघोषित असणारे नामचीन समजणारे चेहरे रसातळाला जाऊ शकतात.
विशिष्ट असे ठराविक टारगेट पूर्ण करण्याचे आदेश चेल्या चपाट्याला असताना व आपली नोकरी वाचवायचे असल्यास मोठ्या प्रमाणात डिपॉझिट आणि त्यावर मिळणारे कमिशन हे बंद होऊ शकते यामुळे चेले चपाटे ठेवीसाठी जंग-जंग पछाडत असताना शहरात ठेवीसाठी एकाच ठिकाणी दोघेजण केले गेले असता थोड्यावेळाने जाऊन त्यातील एकाने ठेव आणल्याने तू माझ्या माघारी जाऊन मी गेलो त्या ठिकाणावरून का ठेव आणली म्हणून त्या नामांकित पतसंस्थेतील दोघांची फ्री स्टाईल सायंकाळच्या रम्य ठिकाणी झाल्याची ही चर्चा आहे येणाऱ्या काळात ग्राहकांना आजुन अनेक सोहळे बघायला व ऐकायला येऊ शकतात.
