
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
य.जि.म.सह बँक व नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमानाने राळेगाव येथे पंचायत समितीचे सभागृहात “वित्तीय व डिजीटल साक्षरता कार्यक्रम” दिनांक २६/०९/२०२३ ला घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्ड बँकेचे जिल्हा प्रबंधक पेंदाम साहेब उपस्थित होते.तसेच जिल्हा बँकेचे वित्तीय व डिजीटल साक्षरता अभियानाचे प्रमुख दीपक भाऊ देशमुख तसेच विभागीय अधिकारी .मिलिंदजी इंगोले, सामाजिक कार्यकर्ते कृषी व जैविक शे.उ.कंपनी चे सचिव सुरेशराव आगलावे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महेश सोनेकर सर उपस्थित होते.
देशमुख साहेब यांनी बँकेचे ऑनलाईन सेवा,ठेवी,तसेच बँकेचे नियमित पिक कर्जदार शेतकरी सभासदांसाठी असलेल्या विविध योजना,विमा,या संदर्भात माहिती दिली.तर नाबार्ड बँकेचे जिल्हा प्रबंधक पेंदाम साहेब यांनी नाबार्ड बँकेच्या विविध योजना काय आहे? यांची माहिती दिली.तसेच शेतकरी उत्पादक कंपनी सक्षम पुरुष व महिला बचत गट यांना नाबार्ड च्या योजना घेऊन सक्षम पणे व्यवसाय सुरु करता येईल यांचे मार्गदर्शन केले.कृषी जैविक शे.उ.कंपनीचे सचिव सुरेश आगलावे यांनी जैविक व शेंद्रीय शेती बाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळ राळेगाव च्या संयोजिका सौ.वृशालीताई डाखोरे व सौ.अर्चना सातपुते तसेच राळेगाव मानव विकास फारमर प्रोडू.कंपनी चे संचालक दिनेश तेलंगे,रामजी कुळसंगे.तसेच बँकेचे सभासद,शेतकरी सभासद,कृ.उ.कंपनी चे संचालक,व महिला बचत गट चे महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसुली अधिकारी जे.जि.खनगण यांनी केलें व सूत्रसंचालन शाखा व्यवस्थापक अनुप केंढे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी वसुली अधिकारी .व्ही.ए.ठाकरे,अमर ठाकरे,कु.प्रज्ञा राऊत,विवेक उंडे,सुरज कोवे,अक्षय येंडे यांनी अधिक परिश्रम घेतले.
