
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वरूड जहागीर वासियाकडून मा. उपविभागीय अधिकारी साहेब राळेगाव मा. तहसिलदार साहेब राळेगावयाना निवेदन सादर करून मौजा वरूड (ज.) ता. राळेगाव, जि. यवतमाळ मौजा बुकई शिवारामध्ये वारंवार वाघ दिसत असल्याने मौजा बुकई शिवारातील सर्व शेतकरी
मौजा बुकई शिवारातील सर्व शेतकरी सतत 15 दिवसापासुन वाघ दिसत असुन दि.24/08/2024 रोजी विजय उत्तम राठोड यांच्या शेतामध्ये गोठयावर बांधलेला बैल मारला व काल दि. 29/08/2024 रोजी डोमा देवीदास जाधव यांच्या गोऱ्यावर हमला केला असता. वनविभागाला माहीती दिली उत्तम असता ते फक्त पाहण्याकरीता येते, व शेतकऱ्यांना शेता मध्ये न जाण्यास सांगते. 8 ते 15 दिवस झाले कोनिही शेतकरी शेतामध्ये जात नाही. व कोन्हीही शेतमजुर शेतामध्ये काम करण्यासाठी येण्यास तयार नाही. करिता आमच्या शेती पडीत राहील. आम्हा शेतकऱ्यांना आमच्या कडुन अपेक्षा आहे की, या वर्षीचे आमचे उत्पन्न काहीच होणार नाही. व या उत्पन्नाची भरपाई आम्हाला शासनाकडून मिळावी. व वनविभागाला आमच्या मदतीसाठी सर्व शेतकऱ्यांना जाळी कंपाउंड व पुर्ण वनविभागाच्या हद्दीत जाळी कंपाउंड करून देणे व आपन स्वतः व इतर महसुल अधिकारी स्वतः येऊन बुकई शिवारातील पाहनी करून त्या शिवारामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. लाईन नाही, वनविभागाच्या जंगलामधुन शेतामध्ये जावे लागते. आम्हा बुकई शिवारातील शेतकऱ्यांना शेती करणे खुप कठीन बाब आहे. शेतकन्यांचे वरील अडचनीचा त्वरीत पर्याय काढावा व पेसा अंतर्गत ग्राम पंचायत लां येत असलेला निधीचा वापर कुठे केला गेला याची सुधा शहानिशा करण्यात यावी करिता व वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावे या करिता आज रोजी निवेदन सादर करण्यात आले.
