
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ
दिनांक 18 एप्रिल रोजी हदगाव मठाचे मठाधिपती श्री चैतन्य महाराज यांनी जगद्गुरु जगत ज्योती स्वामी बसवलिंग ढाणकी शहरात असलेल्या मठाला भेट दिली यावेळी गुरुवर्य बसवलिंग यांच्या विचाराला मानणाऱ्या व त्यांच्या विचाराला वचनाला शिरोधार्य मानून वावरणारा असंख्य असा स्त्री पुरुष तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक यांचा भक्त मेळा जमला होता.
यावेळी गुरुवर्य चैतन्य महाराज म्हणाले समाजात एक संग राहूनच समाजाची देशाची आणि किंबहुना स्वतःची प्रगती साधल्या जाऊ शकते पंख्याला जर एकच पाती असेल तर त्या पंख्याची पाहिजे तशा प्रमाणात हवा प्राप्त होत नाही व त्याला काही किंमत सुद्धा राहत नाही पण त्याच पंख्याला अनेक पात्या मिळाल्या की प्रचंड हवेचा लाभ आपल्याला होतो तसेच समाजाला सुद्धा पुढे जावयाचा असल्यास एकसंघ एक विचार विविधतेतून एकता हा मूलमंत्र ध्यानात ठेवावा लागेल. तसेच समाजामध्ये अनेक होतकरू हुशार व गुणवान विद्यार्थी आहेत पण त्यांची आर्थिक परिस्थिती ही जेमतेम व सर्वसामान्य असल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहत असून समाजातील मिळालेल्या लोकवर्गणीतून गुणवान अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास समाज अधिक प्रगल्भ होईल व हुशार तरुण विद्यार्थी हेच येणाऱ्या काळातील समाजाचे, देशाचे, व आई-वडिलांच्या उत्तम संस्काराचे प्रतिबिंब असते म्हणून समाजाचे परिवर्तन घडवायचे असल्यास अशा विद्यार्थ्यांना मदत करणे समाजाचे आद्य कर्तव्य आहे. तसेच गुरुवर्य चैतन्य स्वामी महाराज पुढे म्हणाले जिथे जिथे शिवमंदिर आहे त्यांचा जिर्णोद्वार करायचा असल्यास व ते काम अर्धवट असल्यास ते काम पूर्णत्वास कसे जाईल याचा सुद्धा आढावा महाराजांनी या वेळेस घेतला मंदिरातून सकारार्थी ऊर्जा मिळते म्हणून असणारी शिव मंदिरे ही जतन व संवर्धन करणे जरुरी आहे. तसेच येणाऱ्या स्वामी बसवेश्वर यांची जयंती निमित्त कार्यक्रमाची रूपरेषा कशा प्रकारची आहे याचाही आढावा महाराजांनी यावेळी घेतला व ती धुमधडाक्यात पण शांततेत कशी होईल हे सुद्धा जाणून घेतले
