लॉयन्स क्लब राळेगाव कॉटन सिटी चा पदग्रहण सोहळा संपन्न


सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव कॉटन सिटीचा प्रथम पदग्रहण सोहळा स्थानिक हरे कृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी लायन्स क्लब नागपूर ग्रीन सिटी च्या पदाधिकाऱ्यांनी क्लबची स्थापना करून नियमावली समजावून सांगितली याप्रसंगी 32 34 एच वन लायन्स क्लब नागपूर ग्रीन सिटी चे पदाधिकारी गव्हर्नर डॉ रिपल राणे किंग ऑफ नागपूर राजे मुधोजी भोसले डॉ पार्वती राणे राम कृषालानी एड अल्पेश देशमुख लायन्स क्लब नागपूरचे अध्यक्ष नरेश गायकवाड रक्षा दडवे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली राळेगाव शाखेच्या अध्यक्षपदी राजेंद्र नागतूरे उपाध्यक्षपदी विनय मूनोत सचिव पदी डॉ संतोष कोकुलवार कोषाध्यक्षपदी पारस वर्मा तर सदस्य म्हणून जानराव गिरी अशोक पिंपरे प्रदीप ठूणे संजय पोपट अनिल डंभा रे विनोद नरड प्रमोद ताकसांडे डॉ कुणाल भोयर मनीष बोथरा वीरेंद्र वाऱ्हेकर रणजीत मोकडे निलेश मिटकर ओम डाखोरे संदीप पेंडोर दीप साटोणे यांना लायन्स क्लब चे प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी नागपूर लायन्स क्लबच्या वतीने जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले सर्व सदस्यांना पदग्रहण करताना शपथ देण्यात आली राळेगाव शाखेकडून उत्तम सामाजिक कार्य घडो अशी अपेक्षा मार्गदर्शन करताना किंग ऑफ नागपूर मुधोजी राजे भोसले यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ संतोष कोकुलवार यांनी केले