उमरी पो. येथे माळी समाजाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात संपन्न

पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम

विद्येची आराध्य दैवत माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे माळी समाज बांधवाच्या वतीने भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी सावित्रीमाईच्या जीवनावर आपल्या विचारांनी प्रकाश टाकला सोबतच बालिका दीना निमित्ताने सावित्रीबाईच्या जीवनावरील मुलींचे नृत्य सादर केले तसेच जयंती निमित्याने गाव भोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अल्का आत्राम यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगितले की सावित्रीबाईचा वारसा सर्व महिला मुलींनी शिक्षणाचा वापर करून सर्वदूर पुढे न्यायचा आहे असा संदेश दिला. यावेळी अल्का आत्राम अध्यक्षा म्हणून तसेच थामेश्वरी लेनगुरे सरपंच उदघाटक म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणूम मनोज मुलकलवार, मंगेश उपरे, नारायण पा थेरे,बंडू लेनगुरे,संदीप मडावी,राजेश्वर परचाके, वाकडे सर,चरदास मडावी,मारोती मडावी, देविदास कुमरे,सदाशिव वाढई, पपीता पोलपोलवार, रोशनी मुलकलवार, मनीषा थेरे, माया कोहळे, सुनीता शेंडे जोगेश्वर लेनगुरे, अनिल पेंदोर चाणकपुरे सर ,अविनाश लेनगुरे खुशाब लेनगुरे आणि गावातील सर्व महिला पुरुष युवक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवानी परीश्रम घेतले