
सहसंपादक: रामभाऊ भोयर
एका 45 वर्षीय शेतकरी पुत्राने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील वेडशी येथे पोळ्याच्या पुर्वसंध्येला 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उमेश बापूराव उताणे 45 वर्ष राहणार वेडशी असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमेश या गेल्या काही दिवसांपासून सततची नापीकी व कर्जबाजारीपणामुळे विवंचनेत राहायचा त्यामुळे उमेशने गळफास सारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवन यात्रा संपविली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे व बीट जमादार संदीप मडावी चालक अमीर किन्नाके यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे उमेश यांचे पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ आई-वडिल असा आप्त परिवार असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.
