खैरे कुणबी महिला समाज संघटना वरोरा यांच्या वतीने हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचें यशस्वी आयोजन

खैरे कुणबी महिला समाज संघटना वरोरा यांच्या वतीने हळदी कुंकू आणि संस्कृतिक कार्यक्रम कटारिया मंगल कार्यालयात 22/1/23 रोज रविवारला घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ पुष्पा वैद्य तर उदघाटीका श्रीमती श्वेता देवतळे होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती चंद्रभागा कोहपरे, सौ रोहिणी देवतळे, सौ वर्षा महाजन, कु प्रतिभा मांडवकर, सौ नर्मदा बोरेकर उपस्थित होत्या. मार्गदर्शिका म्हणून आधी अड प्रीती बोरेकर यांनी कायदेवीषयक व डॉ तेजश्री डंभारे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथीच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ललिता भोयर यांनी केले. प्रस्ताविक अध्यक्षा चैताली देवतळे यांनी केले. सर्व महिलांना तिळगुळ व वानामध्ये गुलाबाची झाडे देण्यात आली. महिला कार्यकारणीने स्वागत गीत सादर केले. आभार प्रदर्शन इशा नरुलेनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी खैरे कुणबी पुरुष समाज संघटना तसेच महिला कार्यकारनीतील मनीषा वैदय, लता हिवरकर, पूजा महल्ले, सुनीता राऊत, वैजयंती भोयर, माधुरी हिवरक, कल्पना डंभारे, गीता भोयर, लीना श्रीरामे, जयश्री रोकडे, कविता डोमकावळे, प्रणिता मानकर, ज्योती कारेकार, शालू कारेकार,साधना कारेकार, लता ढेकरे यांनी प्रयत्न केले.