रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पळसाचे झाडे फुलांनी बहरली,”रंगपंचमीची चाहुल लागल्याने केशरी रंगाच्या पळस फुलांनी नटला परिसर”

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

रंगपंचमी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्ताने निसर्गानेही रंगोउत्सव करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील पळसाची झाडे केशरी रंगांच्या फुलांनी बहरली आहेत. आंब्याच्या झाडाला देखील मोहर आला आहे. रात्रीची थंड हवा आणि सकाळचा गारवा अजुनही सुरु असताना होळीनंतर थंडी लोप पाऊन उन्हाळा सुरू होतो.

पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे. लाल, केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मराठवाड्यातील विविध भागातील डोंगर-दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहे. परंतु, पर्जन्यमान चांगल्या प्रकारे असल्यामुळे होळी होण्यापूर्वी ग्रीष्म ऋतुची चाहुल लागत असून रंगपंचमीची चाहुल लागल्याने केशरी रंगाच्या फुलांची जाहलत हिरव्या पळसाला दिसत आहे. आंब्याच्या वृक्षाला देखील मोहर असून यंदा आमरस गोड होणार असल्याचे दिसत आहे. या निसर्ग वेली झाडा मधील बदल होत असल्याने निसर्ग सर्व सामन्यांना मनमोहक करत आहेत.

निसर्गाने नटलेल्या रानावनात डोंगरकपारी नदी नाल्यातील रोडच्या कडेला हिरवागार पानांच्या पळस वृक्षावरती केशरी रंगाची फुले सर्व सामन्यांची मनेमोहीत करत आहेत.आंब्याच्या वृक्षांना सर्व बाजूंनी मोहर लगडल्याने पिवळसर फुलांनी शेतशिवार नटले आहेत. बर्याच भागात नदीनाले तलावे तर कुठे डोंगराळ भाग असून डोंगरावरती तथा रोडच्या कडेला अनेक ठिकाणी पळसाची झाडे केशरी फुलांनी नटलेली दिसत आहे.

ग्रामीण भागात आजही पळसाच्या रंगाची क्रेझ…


रंगपंचमीला रंग बनवून रंग ऐकमेकांवर उधळून उत्सव साजरा केला जातो. आजही ग्रामीण भागात शेतकरी पळसाच्या फुलांपासून बनविलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर करतात. पळसाची वाळलेली फ , ले गोळा करून पाण्यात भिजवून त्याच बारीक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर वस्त्रामध्ये गाळून त्याचा नैसर्गिक रंग तयार होतो. हा रंग शरीराला हानिकारक नसतो. यावर्षी पावसाळ्यामध्ये पर्जन्यमान चांगले झाल्याने सूर्य आग ओकत आसतांना दिसतो आहे. त्यामूळे सध्या सकाळची थंडी दुपारची उष्णता कायम जाणवत आहे..