
प्रतिनिधी (प्रवीण जोशी)
ढाणकी…..
शेतकरी आणि ससेहोलपट हे नित्यक्रम जणू, ठरलेले ब्रीदवाक्य जे काही नवनवीन बदल शेतीला अनुसरून झाले ते शेतकऱ्यांनी अगदी आनंदाने स्वीकारले एवढेच कशाला लाकडाचे अवजार मुक्त झाले व लोखंडी अवजारे आली शेतकऱ्यांनी त्याचा लगेच स्वीकार केला अर्थातच आधुनिक प्रिय शेतकरी आहे पण ऑनलाईन पेरे आणि ऑनलाईन तक्रारी म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्यात बांधलेले लोढणे होय.
एवढी मोठी महसूल यंत्रणा हजारो रुपये पगार असणारी कर्मचाऱ्यांची फळी ही शेतकऱ्यांसाठीच, असताना पेरे ऑनलाइन करणे शेतकऱ्याच्या माथी मारून महसूल विभाग आपली जबाबदारी झटकत असताना दिसत आहे अनेक शेतकऱ्याजवळ 4g नेटवर्क चालणारे मोबाईल नाही आणि असला तरी त्यातलं त्याला काही समजत नाही. यालाच म्हणतात धरून दाबून बुक्क्याचा मार, सरकारी यंत्रणा बांधावर गेल्यावर दिसते पण जमत नाही म्हणून ही पिक पाहणे या पाहणीसाठी रेंजच नसते तर तांत्रिक दिलेल्या तारखेस झाला नाही सबब सत्तर टक्के शेतकऱ्यांना फटका तर साहाजिकच मोबदला देखील 30 टक्के लोकांना मिळणार म्हणजे सरकार आणि विमा कंपनीचा फायदा हा फायदा शेतकऱ्याच्या पदरात पडू नये म्हणून आधुनिकतेच्या नावाखाली नियम लावून शेतकऱ्याला चक्क अडकून टाकण्याचे प्रकार असल्याचे स्पष्ट मत शेतकरी वर्गात व्यक्त होऊ लागले आहे पेरे अपडेट करणे ही प्रक्रिया वर्षभरातून दोन वेळा करावी लागते खरीप व रब्बी हंगाम काही यंत्रणा हे शेतकऱ्याच्या अडचणी सोडवायला असते. मग हे त्यांचे काम असताना हे पेरे अपडेट करणे ,तक्रारी ऑनलाइन, करणे म्हणजे पायात एक दोरी व गळ्यात एक दोरी बांधणे म्हणजे शेतकऱ्याला घातलेले लोंडने, अर्थातच महसूल विभागाचे काम आणि शेतकऱ्यांच्या गळ्यात बांधलेले लोंडने.
