
प्रतिनिधी:- संजय जाधव
अर्ध शतकाकडे वाटचाल करणाऱ्या गुंज येथील कालबाह्य १३२ के. व्ही. वीज उपकेंद्राच्या अनियमित कारभारामुळे त्रस्त झालेल्या महागाव तालुक्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे. इसापूर टाकळी येथे लवकरच नवीन १३२ के. व्ही. विद्युत उपकेंद्र कार्यान्वित होणार असल्याने महागाव तालुक्यातील अंधार दूर होणार आहे.
महागाव आणि उमरखेड तालुक्यातील अतिरिक्त विजेच्या दाबामुळे कोलमडलेले ३३ के.व्ही. उपकेंद्र आणि वीज टंचाईचा सामना करणारे शेतकरी आणि विद्युत ग्राहक यांना या नविन १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महागाव तालुक्यातील गुंज ते उमरखेड तालुक्यातील खरबी या ६५ किलोमीटर अंतरापर्यंत गुंज येथील एकाच वीज उपकेंद्रावरून विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे अपर्याप्त वीज पुरवठ्याचीसमस्या नित्याचीच झाली आहे.
वारंवार खंडित होणार वीजपुरवठा महागाव तालुक्यातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. पाऊस येवो, वादळ येवो, अथवा जोरात हवा आली तरी वीज गुल होते. गुंज येथील कालबाह्य १३२ के. व्ही. वीज उपकेंद्र शेकडो समस्यांमुळे मृत्यूशय्येवरपोहचले आहे.
परिणामी महागाव तालुक्यात तातडीने नवीन १३२ के.व्ही.वीज उपकेंद्राची गरज होती. महागाव तालुक्यात गुंज येथे १३२ के.व्ही. वीज उपकेंद्र उभारण्यात आले. महागाव, मुडाणा, फुलसांवगी आणि भवानी येथे ३३ के.व्ही. क्षमतेचे चार सबस्टेशन आहेत. भवानी या दुरवरच्या सब स्टेशनपर्यंतचा विद्युत पुरवठा गुंज येथील मुख्य उपकेंद्रावरून केला जातो. अनेक वर्षापूर्वी उभारलेले गुंज येथील वीज उपकेंद्र सध्या समस्यांच्या विळख्यात आहे. महागाव शहरासह तालुक्याचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांसह औद्योगिक आणि कृषी पंपाच्या ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुंज येथील १३२ के. व्ही. उपकेंद्राला हा भार आता सोसत नाही. उपकेंद्राची क्षमता तोकडी पडत असून वीजपुरवठ्याची साधने आणि यंत्रणाही खिळखिळी झाल्यामुळे तासा, दोन तासाला ब्रेकडाऊन ठरलेला आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहक, औद्योकि ग्राहक आणि शेतकऱ्यांना याचा प्रचंड फटका सोसावा लागत आहे. गुंज फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास पूर्ण तालुक्याता वीज पुरवठा खंडीत होतो. ३३ के.व्ही. उपकेंद्र वाहिनीवरून कुठलाही फीडबॅक होत नाही. १३२ के.व्ही. उपकेंद्र अतीभारीत असल्यामुळे नेहमीच कमीत कमी ११ के.व्ही. उच्चदाब वाहिन्या बंद ठेवाव्या लागतात.हे132 केवी उपकेंद्र उमरखेड महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार नामदेवराव ससाणे त्यांच्या प्रयत्नानेमहागाव तालुक्यातील व उंबरखेड तालुक्यातील आमदार दूर होणार आहे यासाठी टाकळी ईसापुर ग्रामपंचायत माझी सरपंच उज्वला प्रभाकर हाके सचिव पि .के .कदम पत्रकार संजय जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अथक प्रयत्नाने हे उपकेंद्र मंजूर करण्यात आलेला आहे लवकरच या कामाचा भूमिपूजन सोहळा सुद्धा होणार आहे
