मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी परीक्षा पे चर्चा अंतर्गत विद्यार्थ्यांनशी साधला सवांद

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम

दिनांक २७/०१/२०२३ रोज शुक्रवारला देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांनी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सवांद साधून परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या भीती, संकोच, प्रश्न याबद्दल मार्गदर्शन केले यांमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चिंतामणी कॉलेज पोंभुर्णा तसेच साईकृपा विद्यालय चिंताळधाबा येथील विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला या कार्यक्रम भेटीसाठी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी, सुलभा पीपरे नागराध्यक्ष, अजित मंगळगिरीवार उपाध्यक्ष, हरीश ढवस महामंत्री,मोहन चलाख उपाध्यक्ष भाजपा, गुरूदास पीपरे महामंत्री आणि शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते…..