सेवा ग्रुप फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; संघटनेच्या प्रभावी कार्याची प्रशंसा

वरोरा: 12 एप्रिल रोजी द्वारका नगरी येथील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या सेवा ग्रुप फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात 141 युवकांनी सदस्यत्व स्वीकारले. फाउंडेशनने शैक्षणिक, सामाजिक आणि न्यायविषयक समस्यांवर केलेले प्रभावी कार्य आणि त्यांच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात मोठी मान्यता मिळाली आहे. अध्यक्ष निखिल मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने दिलेल्या आश्वासनांची आणि कार्याची सराहना करण्यात आली.

सेवा ग्रुप फाउंडेशन, शैक्षणिक, सामाजिक आणि न्यायविषयक समस्यांवर काम करणारी एक उत्कृष्ट संघटना आहे. संघटनेने रक्तदान शिबिरे, अन्नवाटप, कोरोना काळात मदतकार्य, आणि शैक्षणिक मदतीसह अनेक महत्त्वाचे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. अध्यक्ष निखिल मांडवकर यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या कार्यपद्धतींचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमात सचिव अनुप पावडे, उपाध्यक्ष मोनेश भोयर, रुपेश चिंचोलकर, तपू कुलसंगे, संतोष पाझारे, पंकज पेचे, रोशन भट्ट, कुणाल वाटेकर, सतिश बावणे, दिनेश ढोक, आशिष दातारकर ,शैलेश परचाके, गणराज मांडवकर,आकाश खीरटकर,विवेक नन्नावरे,साहिल मडावी , जय चिकटे ,हर्षल पावडे ,धीरज उडकुळे ,नयन साळवे, रितेश नन्नावरे ,कुणाल जीवतोड ,जय चिकटे,हर्षल पावडे,मुकेश पावडे,सागर बोडे ,हर्षबोधी दारुंडे ,रिजवान शेख,विशाल गेडाम ,यशवंत दाहुले ,नरेंद्र खडतकर ,कुशल डोय व इतर सदस्य उपस्थित होते. सेवा ग्रुप फाउंडेशनच्या कार्याने विद्यार्थ्यांना आणि समाजाला दिलेला सकारात्मक बदल प्रशंसेला पात्र आहे, असे सांगता येईल.

“विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी सेवा ग्रुप फाउंडेशन सदैव तत्पर राहील. आम्ही आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे राहू आणि आपल्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.”
अध्यक्ष निखिल मांडवकर सचिव अनुप पावडे.