करंजी ( सो ) येथील ३४९ नागरिकांनी घेतला पहिला आणि दुसरा डोज (कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225

राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) ग्राम पंचायत च्या वतीने आयोजित कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचा पहिला आणि दुसरा डोज दि १/०९/२१ व २/०९/२१ रोजी देण्यात आला या दोन दिवसांमध्ये ३४९ नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोना येथील डॉ.निखिलजी ठाकरे , डॉ.घुडे, सिस्टर संध्याताई इखार ,आरोग्य सेवक गिविंदाजी ठाकरे ,आशा सेविका उषाऐ लखमापुरे
व कर्मचारी यांनी लसीकरण कार्य पूर्ण केले.
या वेळी कर्तव्यदक्ष सरपंच प्रसादभाऊ ठाकरे,उपसरपंच अनिलजी कोडपे व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका मायाताई मादेवार,जि.प.शिक्षक स्वप्नील जीकुदुसे सर ,ग्रा. पं.शिपाई वाल्मीकजी कोडपे व समस्त गावकरी उपस्थित होते.