
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील ऍड .प्रफुल्ल चाहौन यांच्या प्रथम अगमना निमित्त मतदार संघांचे आमदार ना. प्राचार्य डॉ. अशोक उईके यांची महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्रिपदी निवडी बद्दल तसेच राळेगाव शहरातील तरुण तडफदार नेतृत्व ऍड. प्रफुल्लसिहं चौहान यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच भाजपा तालुका अध्यक्षपदी प्रथमच महिला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना ना. उईके यांनी राळेगाव मतदार संघाचा पालक म्हणून मी सदैव राळेगाव शहराच्या विकासासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कटीबद्ध असल्याचे सांगून माझा व माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करून सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सौ. छायाताई पिंपरे यांनी इंदिरा नगर, गांधी लेऑऊट हे माझं कर्मभूमीतील महत्वाचं ठिकाण या भागाचा सर्वांगीण विकास हे माझं प्रथम कर्तव्य असल्याचं सांगितले.
यावेळी सत्कार्मुर्ती भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्लसिहं चौहान यांनी माझा आता पर्यंत नियुक्ती नंतर अनेक ठिकाणी सत्कार झाला मात्र राळेगाव शहरातील ज्या लोकांमध्ये वाढलो, बागडलो, त्या लोकांनी माझा सत्कार केला त्याने मी अतिशय भारावून गेलो हा सत्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे असे सांगितले.
पुढे बोलतांना त्यांनी आपले काही गावाच्या धोरणात्मक कामाबद्दल सांगताना सांगितले की मी राजकारण असो वा समाजकारण करतांना कधीही पक्षीय भेदभाव केला नाही की हा त्या पक्षाचा किंवा त्या जातीचा आपल्याला मिळालेल्या संधीचा आपल्या शहरासाठी, या तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी कसा होईल यांचा मी सदैव प्रयत्न करणार आहोत आणि मला राज्याचे आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर अशोक उईके…यांनी ग्वाही दिली.
या प्रसंगी तालुका पत्रकार संघटना राळेगाव अध्यक्ष प्रकाश मेहता तर सचिव गजेंद्र कुमार ठु ने होते तर… सत्काराला उपस्थित पत्रकार….फिरोज लाखांनी… महेश भोयर…गुद्द्दू मेहता…मनोहर बोभाटे… महेश शेंडे….. यांची उपस्थिती होती.
