
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ , जिल्हा परिषद यवतमाळ ,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे नुकतेच काही दिवसा आधी वेळापत्रक जाहीर झाले असून 22 जुलै 2025 ला बुद्धिबळ ही स्पर्धा आयोजित करून उद्घाटन या स्पर्धेचे करण्यात आले .
या स्पर्धेला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून
न्यू. इंग्लिश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय चे मुख्याध्यापक विजय कचरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंना खेळातून होणाऱ्या शासकीय नोकरीत 5 टक्के राखीव जागा असून त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा तसेच 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डात शालेय स्तरानुसार गुण कसे मिळतात त्या बद्दल खेळाडू विद्यार्थ्यांना माहिती दिली .
सदर स्पर्धेत भरपूर शाळेने सहभाग घेतला असून
जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड तालुका क्रीडा अधिकारी चैताली राऊत यांनी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या असून उद्घाटनीय स्पर्धेत क्रीडा शिक्षक किशोर उईके , प्रवीण कारेकर, गवळी सर , जितेंद यादव , राकेश दुहान , धर्मेंद्र धोटे , थूल सर, व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते व तालुका क्रीडा संयोजक प्रफुल्ल खडसे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले….
