
काल ढाणकी येथे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप बॉस साहेब यांनी युवाशक्ती गणेश मंडळ येथे भेट दिली. तसेच त्यांनी शांतीच्या संदेश देणारे प्रेम पसरवा द्वेष नाही, फक्त मानवता, टी-शर्ट व शाल श्रीफळ देऊन युवाशक्ती गणेश मंडळ अध्यक्ष दत्तात्रय तोटेवाड व महाकाल गणेश मंडळाचे अध्यक्ष अंकुश मिटकरे यांचा सत्कार करण्यात आला. व मंडळास शुभेच्छा दिल्या. यावेळी गावचे पोलीस पाटील रमण रावते, समाजसेवक वसंत फुल्लकोंडवार, जयवंत फुल्लकोंडवार , संभाजी शिरडकर ,राजू दोंतुलवार व युवाशक्ती गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
