
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील निधा येथील ३० वर्षीय तरुण प्रशांत रामचंद्र आगलावे यांचा खर्रा मशीनला करंट लागून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगष्ट २०२४ रोज गुरवारला सकाळी ८:०० वाजताच्या दरम्यान घडली आहे.
प्रशांतने काही दिवसांपूर्वी आपल्या घरी पानठेला टाकून खर्रा मशीनने घोटून खर्रा विकत असे नेहमी प्रमाणे प्रशांत हा १५ ऑगष्ट ला सकाळी खर्रा घोटायला गेला असता खर्रा मशीनला विद्युत प्रवाह संचारला असल्याचे निदर्शनास न आल्याने प्रशांतने मशीनला हात लावताच मशीन घेवून तो जागीच खाली पडला
या बाबतची माहिती खर्रा घेणाऱ्या व्यक्तीने आरडा ओरड करून सांगितली असता गावातील सूरज पत्रकार यांनी घरी जावून घरातील मेन बंद केला व प्रशांतला राळेगांव येथे ग्रामीण रुग्णलय येथे नेत असतांनाच प्रशांतचा वाटेतच मृत्यू झाला असून ३० वर्षीय प्रशांतच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
