
घरफोडी होत असल्याचे लक्षात येताच आरडाओरड करून मांढरे कुटुंबीयांनी घरफोडीचा डाव उधळला . याप्रकरणी ग्रामस्थांच्या मदतीने एका आरोपीस ताब्या घेण्यात आले तर दुसरा फरार झाला . ही घटना स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत चापेगडी येथे घडली . पोलिस काही स्टेशनअंतर्गत गेल्या महिन्यापासून चोरी आदीच्या घटना घडत आहे . अशातच बुधवारी रात्री आरोपी मीतराग मोहनलाला यादव ( 24 ) रा . अजनी रेल्वे स्टेशनच्या मागे , इंदिरानगर क्रमाक 3 , सागर बैसवार यांचे घरी किरायाने , नागपूर व त्याचा सोबती सुमेश उईके दोघेही चापेगडी गावामध्ये घरफोडी करण्याच्या उद्देशाने आले . तेथे त्यांनी अहिल्या आत्मारा मांढरे हिच्या घरी घरफोडी करण्याच्या उद्देशाने घरचा दरवाजा उघडत असताना मांढरे कुटुंबीयांना लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली . त्यामुळे शेजारी व गावातील काही नागरिकांनी मीतराग मोहनलाल यादव याला पकडले तर त्याच्यासोबत असलेला सुमेश हा घटनास्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाला . घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली . तोच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले . याप्रकरणी त्याच्या विरोधात कलम 457 , 380 , 511 , 34 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला .आरोपीस नागरिकांकडून मारहाण मांढरे यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली . त्यामुळे अचानक सर्वीकडून नागरिक आल्याने मीतराग याला पळता आले नाही . मात्र , त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाला . मीतराग नागरिकांच्या हाती लागताच नागरिकांनी त्याला मारहाण केली . या मारहाणीत तो जखमी झाला . पोलिसांनी घटनास्थळावर पोहचताच नागरिकांनी गर्दी सारून आरोपीस ताब्यात घेत कुही येथे वैद्यकीय तपासणी करून आरोपीला अटक केली . परिसरात गेल्या काही महिन्यापासून चोरी , एटीएम फोडीच्या घटना घडत आहे . त्या घटना घडवून आणण्यामागे याच आरोपींचा हात असण्याची तसेच या गुन्ह्यात टोळी सक्रीय असण्याची दाट शक्यता असून या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आरोपीला प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करून आरोपीचा सोमवार 11 एप्रील पर्यतचा पीसीआर मागण्यात आला . गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने तो मंजुर केला . त्यामुळे आणखी मासे गळाला लागण्याची शक्यता आहे .- नकली पिस्तूल , कटर जप्त त्याच्या ताब्यातून एक काळया रंगाच्या बॅगमध्ये घरफोडीकरिता उपयोगात आणले जाणारे साहित्य दोन लोखंडी टॉमी , एक चाकू , एक पेन्चीस , एक कटर , हॅन्ड ग्लोब्ज , नकली लाईटर असलेली पिस्तूल , मास्क , पांढरी टेप पट्टी जप्त करण्यात आली .
