अमोलच्या अनमोल कार्यातून तालुका स्मारक भुमि झाली सुसज्ज ; राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख संजीव भांबोरे यांनी केले अमोलचे अभिनंदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

साकोली शहरातील मध्यवर्ती एकोडी रोड चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे मागील एक वर्षापासून नवनिर्माणधीन कार्य सुरू होते, येथील जमिन महामार्गावरील समपातळीत यावी करीता शहरातील धडाडीचे सामाजिक युवा कार्यकर्ते अमोल जगनराव टेंभुर्णे यांनी मानवतेचा परीचय देत स्वखर्चाने १२० च्या वर हाईवा (डंपर) मातीभरणा टाकीत अखेर येथील जमिनीला उंच करण्याचे धाडस शहरात दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे यासाठी अमोल ने कुठलीच आर्थिक देण घेतली नसून स्वयंखर्चाने श्रमदान सेवेतून हा संकल्प मनात ठेऊन आता येथे पूर्ण १५० डंपर मातीभरणा टाकण्याचा जणू निर्धार घेत अखेर ते पूर्ण करून दाखविले आहे. त्यांच्या या अभिनव कार्याला अखिल भारतीय परीवर्तन मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय प्रसिध्दीप्रमुख व पत्रकार संजीव भांबोरे यांनी कौतुक करीत या दिलदारी व स्वप्न संकल्पनेचे कार्यसम्राट अमोल टेंभुर्णे यांचे राष्ट्रीय व राज्य स्तरावर कौतुक करीत अभिनंदन केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक भुमित समितीतील पदाधिका-यांनीही अमोल टेंभुर्णे यांचे मनपूर्वक आभार मानले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक भुमित निर्माण कार्य संपन्न झाले आहे. येथे राष्ट्रीय महामार्गापासून स्मारक भुमित जाणा-या रस्ता व पटांगण हे खोलगट होते, ते महामार्ग समपातळीत यावे व प्रत्येक येथे होणा-या कार्यक्रमाकरीता दर्शनार्थ्यांना सहज व सोपे जावे यासाठी सर्व्हिस रोडवरून सदर स्मारक भुमि ही जवळजवळ भरण टाकीत समपातळीत आली आहे. येथे आपल्या स्वखर्चाने अमोल टेंभुर्णे यांनी येथे १५० ट्रक मातीभरणा टाकून हे आवार प्रशस्त व सुसज्ज तयार करण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. याकरीता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक भुमि साकोली येथे सौंदर्यात भर घालावी म्हणून येथील सामाजिक युवा कार्यकर्ते अमोल टेंभुर्णे या धाडसी युवकाने विनामुल्य दिडशे च्या वर ट्रक मातीभरणा करून आगमन रस्ता हा सिमेंट रोडांनी स्वखर्चाने बांधला व येथील परिसर समांतरीत आणन्यास तन मन धनाने प्रयत्न केले म्हणुन अखिल भारतीय परीवर्तन मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय प्रसिध्दीप्रमुख व पत्रकार संजीव भांबोरे यांनी कार्यसम्राट अमोल टेंभुर्णे यांचे राष्ट्रीय परीषदेकडून कौतुक व अभिनंदन केले आहे.