लेप्टनंट कर्नल वासुदेव आवरी यांचे निधनाने वणी तालुक्यात पसरली पसरली शोक कळा

प्रतिनिधी: नितेश ताजणे,वणी


वणी :- तालुक्यातील मूर्धोनी येथील ह. भ. प. डॉ. दामोदरराव नारायणराव आवारी यांचे भारतीय सैन्यात लेप्टनंट कर्नल या पदावर कार्यरत असलेले सुपुत्र वासुदेव आवरी यांचे काल ता. ४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चायना बॉर्डरवर कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाल्याने मूर्धोनीगावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

भारतीय सैन्यात मागील १२ वर्षांपासून लेप्टनंट कर्नल वासुदेव आवरी हे आपली सेवा देशासाठी देत असून आणखी त्यांची पदोन्नती होणार होती परंतु नियतीने त्यांचा घात केला व त्यांचे उत्तराखंडात लडाक व चायनाच्या सीमेजवळ आपले कर्तव्यपास पाडत असताना त्यांच्या हृदयात अचानक दुखणं वाढलं व त्यात त्यांना हृदय विकाराचा जोरदार झटका आला व त्यांचे एका क्षणात होत्याचे नव्हते होऊन प्राणज्योत मावडली त्यांचा मृत्यदेह उध्या ता.६ रोजी दुपार पर्यंत मूर्धोनी या गावात पोहचणार असून ता. ७ रोजी त्यांच्यावर अतिंविधी होणार असल्याची माहिती त्यांचे चुलते डॉ भालचंद्र आवरी यांनी दिली आहे. लेप्टनंट कर्नल वासुदेव आवरी यांच्या निधनानंतर त्यांचे प्रच्छात आई वडील,भाऊ, पत्नी, मुगला व बरचा मोठा आवरी परिवार आहेत. त्यांच्या अश्या आकस्मित जाण्याने संपूर्ण आवरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.