
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी मौजे मसाजोग तालुका केज जिल्हा बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात आली त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी राळेगाव तालुक्या त तहसीलदार कार्यालय राळेगाव येथे राळेगाव तालुक्यातील सर्व सरपंचाचे वतीने दोशीवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणी
१)सीआयडी चे मार्फत चौकशी व्हावी.
१)फास्ट ट्रॅक कोर्टात निर्णय व्हावा.
३)आरोपींना फाशी व्हावी
४) तसेच मागणी केलेल्या सरपंचाला बंदुकीचे(रीव्हाल्वर ) लायसन्स देण्यात यावे या मागणीसाठी आज निवेदन देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर पाटील जवादे तालुका अध्यक्ष ईंदलसिंग राठोड सरपंच राजूभाऊ तेलंगे अंकुश मुनेश्वर संतोष सरटे मोहन नरडवार व तालूक्यातील सरपंच उपस्थित होते.
