
सहसंपादक: रामभाऊ भोयर
स्थानिक आदर्श दुर्गा उत्सव मंडळ चे वतीने उभारण्यात आलेल्या मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभमूहर्ताला देवीच्या मूर्ती ची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मध्ये इंदिरा नगर, गांधी लेआऊट व गावातील पुरुष, बालगोपाल, महिला मंडळींनी आपला सहभाग नोंदविला. मिरवणूकीचे आकर्षण देविची मूर्ती सुंदर सजविण्यात आलेल्या बग्गीवर विराजमान करण्यात आली सोबतच लायटिंग, कलशधारी महिला, दिंडी, बँड बाजा सहित भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दुसऱ्या दिवशी प. पु. महतं आई अंबिका भारती (काकु ) संस्थांपिका ॐ नवशक्ती भक्तीधाम संस्थान बोपापूर (वाणी ) व श्री बालयोगी संत अनंत महाराज श्रीरामपूर (कोदूर्ली ) यांच्या उपस्थितीत दुर्गामाता मुर्तीची प्राणप्रतिष्ठा हवन पूर्णाहुती करण्यात आली. कळसारोहण प. पु. श्री. विजय महाराज राजेश्वर मंदिर संस्थान पोटी (वाऱ्हा ) यांचे शुभहस्ते करण्यात आला.
तिसऱ्या दिवशी श्री केदारेश्वर भक्त जागरण मंडळ, यवतमाळ सोनु शुक्ला व संच यांच्या मधुर आवाजात माँ दुर्गा देवीचा जागर करण्यात आला. या सर्व सोहळा चे आयोजन डॉ. ज्ञानेश्वर मुडे आजीवन प्रचारक तथा सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान मोझरी (गुरुकुंज ), मेघ:शाम चांदे (मामा ) सचिव, श्री रामचंद्र देवस्थान राळेगाव व आदर्श दुर्गा माता मंदिराचे पुजारी किशोर वाणी महाराज रावेरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या सोहळ्याच्या पुजेचे मुख्य यजमान सौ. जयश्री लढी व शशिमोहन लढी यांनी स्वीकारले, सर्व हवन, विधी चे पौराहित्य आचार्य श्री रवि चिंचाळे गुरुजी यवतमाळ व ब्राम्हवृंद यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरिता आदर्श मंडळाचे जेष्ठ सदस्य पुरुषोत्तम डाखोरे, प्रभाकर राऊत, नामदेवराव रोहणकर, प्रदिपराव डाखोरे, हमीदभाई पठाण, विजय वैद्य, खुशालराव रोहणकर, राजेंद्र नागतुरे, अरुण सेगेकर, अशोक भागवत, फिरोज लाखाणी, प्रदिप ठुणे, सैय्यद युसूफली, राजू झाडे, दिलीप लांभाडे, संदीप झाडे, संजय राऊत, समीर लाखाणी, संदीप बेडदेवार, सुरेश गहरवाल, मनोज भोयर, अमोल पंडित, अंकित बोटरे, दिपक गजर, विजय भोयर, पांडुरंग धोटे, संतोष घोडे, अमर लाखाणी, रितेश चिटमलवार, आकाश धनालकोटवार, रोशन भाविक, शरद एकोणकर, शाम कनाके, अनुप नागोसे, अभिजित राऊत, अनिल राऊत, अनुप रोहणकर, प्रतिक गिरी, गजानन गिरी, गणेश ठाकरे, उमेश कोसूळकर, श्रीकांत चव्हाण, स्वप्नील नागोसे, गौरव किनाके, नरेश आमटे, शेख रऊफ, अमोल ठुणे, गणेश लाटणकर, सागर ठुणे, विजय चौधरी, दिनेश राऊत, किसना बोरवार, मुन्ना धनलकोटवार, करण धनलकोटवार, सुरज बावणे, गजानन मोगरे, प्रणय देवतळे, नंदकिशोर लढी, अजय मिसरे, वैभव रामगडे, वैभव दुबे, रामा साळूंखे, विनोद आमटे, सुभाष चौधरी, धनराज सेगेकर, प्रलय टिप्रमवार, अशोक राऊत, प्रकाश भावे, संतोष धांदे, अनिल परचाके, बंडू थुटूरकर, विजय किन्नाके, राजू झलके, ज्ञानेश्वर गिरी, गजानन बोभाटे, शकील लाखाणी, चेतन बेंभारे, मनोहर बोभाटे, दिनेश झाडे, अनिल मस्के, चंदन नगराळे, अविनाश फुलमाळी, रमेश राऊत, शंकर लांडगे, गजानन बेसेकर, निलेश डोंगरे, गजानन बोरकर, नितीन बेंभारे, जगदीश राऊत, रवि संदेलवार,गजानन अक्कलवार, अक्षय रोहणकर, सचिन एनगृतवार, विकास एनगृतवार, पंकज नागोसे, धीरज गिरी, प्रतिक धोबे, हर्षल बोबडे, साहिल सैय्यद, मिलिंद वाघाडे, अविनाश जुनघरे, वैभव बोभाटे, गजानन किन्नाके, पवन किन्नाके, प्रतिक खापर्डे, कुणाल भाविक, नरेश आमटे, सागर आगरकर, श्रीकांत मगरे, स्वप्नील संदेलवार, वसीम पठाण, यश घ्यारे, हिमांशू ठाकरे, हिमांशू ठुणे, पवन मडावी, रवि वनस्कर, सुरज पवार, संकेत ढाले, गणेश सावरकर, राजू विरुळकर, आर्यन बोभाटे, साहिल लाखाणी, ओम कोसूळकार, राज झाडे, ओम बेडदेवार, रौनक झाडे, साई एनगृतवार, आहिल लाखाणी, दिव्यम तेलंगे, अब्राहम लाखाणी, विराट, महेश परचाके, सतिश बोरवार सह मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनीही अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा शेवट महाप्रसादाने करण्यात आला.
