झाडगाव ते झरगड रस्त्यावरील पुलावरून वाहते पुराचे पाणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव ते झरगड रोडवर असलेल्या पुलावरून पुराचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत असते त्यामुळे एखाद्या वेळेस मोठी दुर्घटना घडु शकते हा पुल लहान असुन ढोले टाकुन तयार करण्यात आला त्यावरती स्वरक्षण कठाडे नाही या पुलाची लांबी रूंद्दी लहान आहे दुसरे वाहन चालवताना कठीण समश्या निर्माण होते येथुन झरगड तीन किलोमीटर अंतरावर असुन झाडगाव येथे बाजारपेठ असल्याने रोज ये जा करावे लागत असते या झाडगाव लगेच नाल्यावर वरूड जहागीर येथे मोठे धरन बांधकाम करण्यात आले पण या पुलाची उंची वाढविण्यात आली नाही त्यामुळे थोडा पाऊस पडला की या पुलावरुन मोठ्या प्रमाणात पुर येतो आता पावसाळा सुरु असल्याने रोज या रस्त्यावरील पुलावरुन पुराचे पाणी वाहत असते त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने रोष व्यक्त होतांना दिसुन येतो
झरगड ह्या गावाला जाण्यासाठी हा एकच रस्ता असलेल्याने पुरातुन वाट काढत जावे लागत असते अनेक दा या पुरातुन मोटरसायकल घेऊन जात असतांना पुरात वाहत गेले छोटे मोठे अपघात झाले या झरगड रोडवर झाडगाव येथील अनेक शेतकऱ्यांची या भागात शेती असल्याने रोज या पुलावरुन शेतात जावे लागते रात्री घरी येतांना पुराचे पाणी कमी होतपर्यंत नाल्या काढी ताटकाळत उभे राहावे लागत असते त्यामुळे शेतीची कामे करतांना मोठी अडचण निर्माण होत असते अनेकदा निवेदने दिली पण कोणताच फायदा होत नाही या गावाकडे लोकप्रतिनिधींचे सुध्दा दुर्लक्ष असल्याचे दिसुन येते तरी संबधीत बांधकाम विभागाने पुलाची उंच वाढवावी जेणे करुन पुन्हा तिच समस्या निर्माण होऊ नये अशी मागणी होतांना दिसुन येत आहे.