सहसंपादक : रामभाऊ भोयर
एका ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनुर्ली शिवारात आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान उघडकीस आली.
पांडुरंग हरिभाऊ घुगुसकार वय ५० वर्ष राहणार सोनूर्ली असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग घुघुसकार यांचे सोनूर्ली शिवारात शेत आहे,शेती कामानिमित्त ते पहाटेच्या दरम्यान शेतात गेले होते.
अचानक शेती कामासाठी आलेल्या मजुराला पांडुरंग घुघुसकार हे झाडाला गळफास लावून असल्याचे दिसले. त्याने ही माहिती राळेगाव पोलिसांना दिली तात्काळ बीट जमादार प्रिया बारेकर,गोपनीय शाखेचे रुपेश जाधव यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पुढील तपास राळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शितल मालटे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार प्रिया बारेकर हे करीत आहे.
